आईवडिलांचे छत्र हरवलेल्या तीन भावंडांना मिळाला मायेचा हात…

पातूर – निशांत गवई

पातूर येथील सामाजिक कार्यकर्ते कालकथित समाधानजी बोरकर,यांच्या विचारांचा वारसा चालवणारे वणराई गौरक्षण बहु. संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बोरकर यांनी तुलंगा या गावातील आईवडिलांचे छत्र हरवलेल्या दाभाडे परिवारातिल एका निराधार लहान तीन भावंडाना मदत करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.

2020 ला पारस फाट्याजवळ भीषण ॲक्सिडेंट मध्ये मृत्यू पावलेले वडिल मृ.सुधाकर शेषराव दाभाडे यांचा मृत्यु दि.22/08 2020 रोजी झाला ही जखम ओलीच असतांना आई मृ.अनिता सुधाकर दाभाडे यांचा ही मृत्यु 10/09/2020ला झाला. आई-वडिलांच्या गेल्यानंतर या मुलांवर आभाळ कोसळून पडले.मुलं खूप हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगत होते. एक नाही तर एक काळाने यांच्यावर आघात केला.

मृतक सुधाकर -अनिता यांना तीन मुले आहेत,दोन मुली आणि एक मुलगा असून स्नेहल अकरावीला,अर्पिता सातवी ला,तर लहाना मुलगा संघर्ष हा दुसऱ्या वर्गात आज रोजी शिक्षण घेत आहेत.काळाने केलेली यांच्यासोबत मजाक हा जगण्याचा संघर्ष या तीनही भावंडांना आयुष्यामध्ये काढावा लागतो आहे,ही सदर बाबत माहिती होतास पातुर चे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्रीकांत बोरकर यांनी सदर लहान मुलांची भेट घेवुन मुले सज्ञान होईपर्यंत त्यांचा सांभाळ करून त्यांना काल जीवनापयोगी व शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात पुढे केला.

कोरोणाच्या काळामध्ये सामान्य माणसाला जगणे कठीण झाले अशा काळामध्ये या अनाथ मुलांवर कोसळलेले आभाळ थोडं का होईना या सदर मदतीने कमी झाले.आज समाजामध्ये आपल्या अवतीभवती कितीतरी मुलांना आई वडिलांपासून नियतीने वेगळे केले त्या सगळ्या मुलांना माणुसकीच्या नात्याने आपण मदत केली पाहिजे आणि यासाठी श्रीकांत बोरकर हे खरोखर आदर्श म्हणून समाजासमोर उभे आहेत.

या आधी सुद्धा 2014ला श्रीकांत बोरकर यांनी देऊळगाव येथील 4 भावंडांना दत्तक घेतले होते,मुली सज्ञान झाल्यानंतर त्यांचे लग्न ही लावुन दिले.या सदर कार्यामध्ये त्यांना आपल्या वडिलांच्या विचारांचा वारसा लाभला आहे कारण कालकथित समाधानजी बोरकर हे नेहमी समाजामध्ये आपल्याने होईल तेवढी मदत समाजकार्याला करीत होते,हा वसा घेवुन त्यांच्याच पावलावर पाऊल त्यांचा मुलगा श्रीकांत बोरकर हे सुद्धा नियमितपणे समाजकार्य करून त्यांचा वारसा चालवतांना दिसत आहेत.

आईवडीलाविना पोरके झालेल्या दाभाडे कुटुंबातील लहान भावंडांना भविष्यातही जीवनोपयोगी वस्तू देऊन शैक्षणिक मदत करून शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन याठिकाणी श्रीकांत बोरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here