पोलीस स्टेशन समोरूनच २.४० लक्ष रुपये घेवुन चोराचा पोबारा…लाखो रुपये कारमध्ये ठेवुन जाणे भोवले…

रामटेक – राजु कापसे

लाखो रुपये आपल्या कारमध्ये ठेवुन काही कामासाठी बाहेर जाणे एका इसमाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी चक्क कारच्या काचा फोडुन २.४० लक्ष रुपयावर हात साफ केल्याची घटना आज रामटेक पोलिस स्टेशन समोर घडली. ही घटना चक्क पोलीस स्टेशन पुढेच घडल्याने नागरीकांमध्ये सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असुन आच्छर्य व्यक्त केल्या जात आहे.

साजीद शेख असे फिर्यादीचे नाव असुन त्याचा मनसर परीसरात विटभट्टा आहे. सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार आज साजीद शेख चालान भरण्यासाठी रामटेकच्या स्टेट बँक येथे आलेले होते मात्र लिंक नसल्याने ते चालान न भरताच बँकेतुन परत निघाले व पोलीस स्टेशन पुढे येवुन त्यांनी पोलीस स्टेशन पुढे संरक्षण भिंती जवळ आपली एम.एच. ३१ ई.ए. – ३३६४ क्रमांकाची कार उभी ठेवली.

दरम्यान यावेळी त्यांनी आपल्याजवळील २.४० लक्ष रुपयांची रक्कम कारमध्येच ठेवुन ते काही कामानिमित्य लागुनच असलेल्या तहसिल कार्यालयामध्ये निघुन गेले. काही वेळाने ते परत आले असता त्यांना कारची समोरची डाव्या बाजुची काच फुटलेली दिसली.

लागलीच त्यांनी कारमधील पैसे पाहिले असता ते चोरी झाल्याचे त्यांना लक्षात आले. लगेच त्यांनी सदर घटनेची माहिती रामटेक पोलिसांना दिली. पोलिसांनी कारची तपासणी करून स्टेट बँकेमध्ये मौका चौकशी केली. उर्वरीत तपास रामटेक पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here