महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसका मारून चोरट्यानी पळविले…

सांगली – ज्योती मोरे.

महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी पळवून नेले याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सौ मीना अण्णासाहेब वठारे वय 76 व्यवसाय घरकाम राहणार निशांत कॉलनी घेवारे प्लॉट, बापट मळा जवळ, सांगली या दिनांक 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान चांदणी चौकाच्या दिशेने असलेले करण बाजार येथील रोडवरून जात असता,

मोटर सायकल वरून आलेल्या दोघा अनोळखी चोरट्या पैकी मागील बसलेल्या इसमाने फिर्यादी मीना वठारे यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण याची किंमत 1 लाख 25 हजार रूपये इतकी असून ते गंठण हिसका मारून तोडून ते घेऊन मोटर सायकल वरून चोरटे पळून गेले याबाबत मीना वठारे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here