बळी पडला स्वस्त सोन्याचा मोहाला…फसला गेला चार लाखाला…! किनवट तालुक्यातील घटना

महेंद्र गायकवाड
नांदेड
फसवणुकी संदर्भात दररोज सोशल मीडिया व विविध वर्तमानपत्रातून बातम्याद्वारे जनजागृती होत असतानाही अनेकज दामदुप्पटच्या मोहात,लालसेपोटी फसवणुकीला बळी पडत आहेत अशीच एक घटना किनवट तालुक्यात घडली असून स्वस्त सोन्याच्या नादात चार लाखाची फसवणूक झाल्याने किनवट येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

किनवट तालुक्यातील रिठा तांडा येथील दिनेश राठोड या युवकास चार अनोळखी आरोपींनी सोन्याचे क्वाईन स्वस्तात देतो म्हणून 1 फेब्रुवारी रोजी 5.30 सुमारास धानोरा घाट मुख्य रस्त्यावर चार लाख रुपये घेऊन बोलावले व तिथे तीन अनोळखी इसम नातेवाईकांसोबत होते. हे अनोळखी इसम सोने घेवून येतो म्हणून चार लाख रुपये घेऊन निघून गेले.

या प्रकरणी दिनेश राठोड यांच्या फिर्यादीवरून विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुरन 11/2022 कलम 420,34 भादवि कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एम.डी. राठोड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here