मिरची तोडणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटली, मोहाडी तालुक्यातील वासेरा येथील वळणावरील घटना…

गोंदिया – भंडारा – अमरदिप बडगे

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कांद्री-रामटेक राज्यमार्गावर असलेल्या वासेरा या गावाजवळ मिरची तोड करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटली.बुधवार दि.२४ नोव्हेंबर २०२१ ला सकाळी १० वाजता सुमारास घडली.या घटनेत २१ जण गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये१९ महिला,चालक व एका ४ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

या सर्वांना उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र जांब व मोहाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या सर्व महिला सकाळी ९ वाजता सुमारास टाटासुमो क्रमांक ३६/ ५५५२ या वाहनाने पिटेसुरवरून नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील येथील आसोली गावात मिरची तोडण्याकरता जात होत्या.वासेरा गावाजवळ वळणावर ही सुमो सकाळी १० वाजता सुमारास उलटली.यात गाडीचा चेंदामेंदा झाला.सुदैवाने जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच आंधळगाव पोलीस ठाणेदार सुरेश मठ्ठामी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश ताराचंद मते,विजेंद्र सिंगनजुडे,बाबुराव हुलमुंडे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये असलेल्या आरती मुलचंद नेवारे (१८),दिपाली पितांबर खोब्रागडे (२१),अस्विनी अरविंद तिरपुडे(४५),शीला राजेंद्र साखरे(३५),वैशाली चंदन उके (३५),सुरेखा गोपाल शेंडे( ३१),

माया परमेश्वर ऊके (४५) यांना मोहाडी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांचे कार्यकर्ते डॉ.सुनिल सपंतराव चवळे,सचिन कारेमोरे,आदर्श बडवाईक यांच्या उपस्थितीत डॉ.राजेंद्र सोनवाणे,डॉ.शिल्पा टांगले,अधिपरिचरिका अनिता हुसेन,कीर्ती शर्मा,वैशाली पाटील,आनंद गुनेरिया,पिंकी बघेले यांनी उपचार केले.ओमलता धनपाल नेवारे(२९),

कल्पना पितांबर खोब्रागडे (४५), संघमित्रा गेडाम (५०),लक्ष्मी रंगराव ऊके (५०),अंजनी ज्ञानेश्वर उके(५५),सुकेशनी राजेंद्र तिरपुडे (३२),अनिता सुरेश अडमाचे (३५),उषा सुरेश राऊत (३८),लता संतोष साखरे (३८),शीला राजेंद्र साखरे (३५),चंद्रकला जीवन चौधरी (६०),

परमिला चित्रपाल बिंजेवार (४८), निरंजना तागडे (४१), मनीषा ईश्वरद्याल शेंडे (४०),टाटा सुमो चालक परमेश्वर इशरत ऊके (४०)व मुलगा प्रियांश परमेश्वर ऊके(४) हे सुद्धा गंभीर जखमी असून त्यांना उपचारार्थ भंडारा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here