प्रेयसी गेली रिक्षावाल्यासोबत पळून…प्रेमभंग झालेल्या प्रेमीनी केला हा धक्कादायक प्रकार…

(फोटो फाईल)

पुणे- पुण्यात लष्कर पोलिसांनी रविवारी एका चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल ८० चोरीचे मोबाईल फोन जप्त केले. या चोरट्याने चोरलेले हे सगळे मोबाईल फोन हे रिक्षाचालकांचे असल्याचे सांगितले मात्र या चोरी मागील कहाणी जरा वेगळीच आहे.

घडलेली हकीकत अशी की, पुण्याच्या लष्कर पोलिसांनी एक प्रेमवीर चोरटा पकडला आहे. पोलिसांनी या चोरट्याकडून तब्बल ८० चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे. हे सगळे ८० मोबाईल हे रिक्षाचालकांचे आहेत. हे मोबाईल का चोरले आणि ते सगळे रिक्षावाल्यांचेच का चोरले याच चोरट्याने पोलिसांना दिलेल उत्तर डोकं चक्रावून टाकणारं आहे.

चोरट्याचे नाव आसिफ उर्फ बोहरा शेख असून त्याचे एका मुलीवर प्रेम होते, आसिफची प्रेयसी ही मूळची गुजरातची आहे. दोघांची लव्हस्टोरी चांगली सुरू होती. पण, अचानक त्याच्या प्रेयसीचे काही महिन्यांपूर्वी एका रिक्षाचालकासोबत प्रेमसंबंध जुळले. याची खबर आसिफला लागायच्या आता तिने रिक्षासोबत पळ काढला होता. आपली प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून गेली हे ऐकून आसिफला जबर धक्का बसला.

आसिफला प्रेयसीचा राग तर होताच पण रिक्षाचालकांची त्याला चीड आली. त्यामुळे  त्याच रागाने चिडून जाऊन त्याने रिक्षाचालकांना टार्गेट करून रिक्षा चालकांचे मोबाईल चोरायला सुरुवात केली.त्याने आतापर्यंत ८० रिक्षाचालकांचे मोबाईल चोरले. चोरी करताना ही आसिफने इतर कुणाचेही फोन न चोरता केवळ रिक्षाचालकांनाच आपलं लक्ष्य केल होते.

प्रेमात धोका दिल्यावर माणूस काय करेल याचा नेम नाही. याचा प्रत्यय आला प्रेमभंग झाल्यामुळे गुन्हेगारी मार्ग पत्कारणे आसिफला महागात पडले आहे. अखेर पोलिसांनी आसिफला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रशेखर भोसले करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here