जोपर्यंत एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप चालूच ठेवणार – महेश शेळके…

सांगली – ज्योती मोरे

दिनांक 24 रोजी परिवहन मंत्री मा. परब साहेबांनी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव जाहीर करून हा संप माघार घेण्याचे आवाहन केले. हा प्रस्ताव सांगली आगारातील कर्मचाऱ्यांनी अमान्य केले असून, सरकारच्या या प्रस्तावाचे गाजर दाखवून निषेध केला. यावेळी माजी आ. नितीन राजे शिंदे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी विलिनीकरणाची होती. इतर राज्याच्या धरतीने एसटी महामंडळाचे पण विलीनीकरण करायला होतं.

पण ते न करता आर्थिक मागण्या मंजूर करून. हा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत.या वेळी सांगली आगारातील कर्मचारी श्री महेश शेळके म्हणाले, परिवहन मंत्री अंतरीम वाढीचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव चुकीचा असून आमचा दर चार वर्षाला करार होत असतो.2016 ते 2020 व 2020 ते 2024 असे दोन करार सध्या प्रलंबित आहे.

त्या दोन कराराची रक्कम देखील या पेक्षा जास्त होईल. आमची मुख्य मागणी महामंडळाच्या विलिनीकरणाची आहे. त्या मागणीशी आम्ही ठाम असून,जो पर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत संप चालू राहील.एस टी कर्मचारी उमेश पाटील म्हणाले, परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेली वेतन वाढ सातव्या वेतन आयोगाला धरून नाही.

इतर राज्याच्या धरतीवर एसटी महामंडळाचे जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तो पर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही.अविनाश मोहिते म्हणाले, परिवहन मंत्री यांचा हा संप मोडीत काढण्याच्या प्रयत्न या प्रस्तावातून दिसून येतो. त्यावेळी अनेक कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here