भाजपा सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील कर ताबडतोब कमी करावेत यासाठी आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या आधी पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला. त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे.

केंद्र सरकारने नुकतीच डिझेलवरील कर कमी केले तर इतर राज्यांनी देखील कर कमी केले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाने पेट्रोल व डिझेल वरील कर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा याकरिता भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे म्हणाले, काही दिवसापासून जागतिक बाजार पेठेत पेट्रोल-डिझेलच्या किमती सतत वाढत आहेत. त्यास दिलासा देण्याच्या दृष्टीने दिवाळीमध्ये पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी पेट्रोल डिझेल वरील केंद्र सरकारचे कर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. या धर्तीवर त्यांनी सर्व राज्यातील सरकारांना विनंती केली होती.

देशातील एकूण २२ राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात अधिकची सवलत दिली आहे व त्यामध्ये भाजपाशासित राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महाराष्ट्र राज्याने मात्र अद्याप सवलत दिलेली नाही याबद्दल भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा वतीने आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. यावेळी आमदार. सुधीर दादा गाडगीळ, भाजपा प्रदेश सदस्य शेखर इनामदार,

माजी आमदार नितीन राजे शिंदे, जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, गटनेते विनायक सिंहासने, माजी महापौर संगीता खोत, प्रकाशतात्या बिरजे, संघटक सरचिटणीस दीपक माने, युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष पै धीरज सूर्यवंशी, अविनाश मोहिते, बाळासाहेब पाटील, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे अल्पसंख्यांक प्रदेश सचिव अश्रफ वांकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, नगरसेवक रणजित सावर्डेकर, सुजित राऊत,

धनेश कातगडे, प्रियानंद कांबळे, डॉ भालचंद्र साठे, प्रदेश महिला मोर्चा प्रदेश सदस्या स्मिता पवार, ज्योती कांबळे, युवती संयोजिका दिव्या कुलकर्णी, प्रथमेश वैद्य कुपवाड मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते, पूर्व मंडल अध्यक्ष दरीबा बंडगर, पश्चिम मंडल अध्यक्ष दीपक कर्वे, अनिकेत बेळगावे, अजित वाले, गंगा तिडके, माधुरी वसगडेकर, सुस्मिता कुलकर्णी, कामगार आघाडी अध्यक्ष प्रियानंद कांबळे, अनिकेत खिलारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here