स्व.महेंद्र अधिकारी यांचे सामाजिक कार्य यापुढेही अविरत सुरू राहणार…

जनसेवक महेंद्रजी अधिकारी मेमोरियल ट्रस्टची स्थापना

पालघर – पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील सहकार, समाजसेवा, क्रीडा, शिक्षण आणि राजकारणातील एक नामांकित आणि उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे उद्योजक स्व.महेंद्र रत्नाकर अधिकारी. महेंद्र अधिकारी यांचे दि. 29 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मुंबई येथे निधन झाले.

आज स्व. महेंद्र अधिकारी यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे मित्रपरिवार, कुटुंबीय, आप्तेष्ट व हितचिंतक यांनी कै.अधिकारी यांचे निस्वार्थ, प्रामाणिक कार्य अखंडित रहावे म्हणून जनसेवक महेंद्रजी अधिकारी मेमोरियल ट्रस्ट ची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून गरजवंताना मानवतेच्या दृषटिकोनातून
मदत करण्याचा उद्देश आहे.

आज या ट्रस्टच्या माध्यमातून स्व. महेंद्र अधिकारी चेअरमन असलेल्या काटाळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील व नागझरी शेतकरी बांधवांना एकूण ४०० केशर जातीच्या आंब्याची रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच यापुढे गरजवंताना ट्रस्टच्या माध्यमातून मदत होइल.

“जनसेवक महेंद्रजी अधिकारी मेमोरियल ट्रस्ट या ट्रस्ट च्या माध्यमातून महेंद्र अधिकारी यांची कार्यरुपी ज्योत अखंड तेवत ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल” असे स्व. महेंद्र अधिकारी यांचे बंधू श्री. रुपेश अधिकारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here