अमरावती जिल्ह्यात थकित वीजबिलाची परिस्थिती अत्यंत नाजूक; सुहास रंगारी, प्रादेशिक संचालक…

थकित वीजबिलामुळे वीज पुरवठ्यावर परिणामाची शक्यता दाट…
जिल्ह्याला ३७८ कोटी वसूलीचे उध्दीष्ट…
जुन महिन्यातही उध्दीष्टाच्या केवळ ३४ टक्केच वसूली…

अमरावती जिल्ह्यात महावितरणच्या  वीजबिलाच्या थकबाकीची परिस्थिती अत्यंत नाजूक असून जिल्ह्यात जुन महिन्यात उध्दीष्टाच्या फक्त ३४ टक्केच वसूली झाली आहे. याशिवाय जुलै महिन्यात पहिल्या २२ दिवसात ३७८ कोटीच्या उध्दीष्टापैकी केवळ ७७ कोटीच वसूल झाले आहे. 

महावितरणची सध्याची आर्थीक परिस्थिती बघीतली तर , भविष्यात थकबाकीदार ग्राहकांना उधारित वीज देणे महावितरणला शक्य नसल्याने थकबाकीदार वीज ग्राहकांकडून शंभर टक्के थकबाकी वसूल करण्याचे निर्देश नागपुर विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी यांनी दिले आहे.

अमरावती येथील महावितरणच्या विद्युत भवन येथे झालेल्या आढावा बैठकित ते बोलत होते.या बैठकिला मुख्य अभियंता श्रीमती सुचित्रा गुजर, उप महाव्यवस्थापक (वित्त वे लेखा)श्री.शरद दाहेदार,अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे,कार्यकारी अभियंते आनंद काटकर,भारतभूषण औगड,अनिरूध्द आलेगावकर,दिपक अघाव, यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्रादेशिक संचालक म्हणाले की, वसूली हा महावितरणचा कणा आहे.परंतू राज्यातील वीज ग्राहकांकडे सुमारे ७२ हजार कोटीच्या घरात थकबाकी असतांना महावितरणला वीज ग्राहकाची विजेची गरज भागविण्यासाठी हजारो कोटीचे कर्ज काढून वीज पुरवठा करावा लागत आहे.त्यामुळे याचा परिणाम येणाऱ्या काळात वीज पुरवठ्यावर होणार असल्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.

अमरावती जिल्ह्यात सर्व वर्गवारितील ५ लाख ५० हजार वीज ग्राहकांकडून जुलै महिन्यात ३७८ कोटी वसूलीचे उध्दीष्टे देण्यात आले आहे. त्यापैकी मागील २२ दिवसात केवळ १६.४६ टक्केच वसूली झाले आहे.

त्यामुळे पुढील ९ दिवसात ८३.५४ टक्के वसूलीचे टार्गेट पुर्ण करावे लागणार आहे.असे न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर नाईलाजास्तव  कारवाई करावी लागणार असल्याचे प्रादेशिक संचालक यांनी यावेळी सांगीतले. याचाच भाग म्हणून काही  अभियंतांवर कर्तव्यात कसूर करण्याचा ठपका ठेवत  कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सुचना प्रादेशिक संचालकाकडून करण्यात आल्या आहे.

यावेळी प्रादेशिक संचालक यांनी उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत देण्यात येणाऱ्या कृषी वीज जोडणीचा आढावा घेतला आणि मार्च २०१८ पुर्वी पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांना वीज जोडणी देण्याचे काम सप्टेंबर पुर्वी पुर्ण करण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या.

तसेच एकात्मिक ऊर्जा विकास योजना (IPDS) व पंडित दिन दयाल उपाध्याय योजना (DDUGJY) ह्या पुर्ण झाल्या असून या योजनेअंतर्गत असलेली उर्वरित कामे ३१ जुलै पर्यंत पुर्ण करण्यात याव्यात. यासोबतच जिल्ह्यातील R-APDRP टाऊनची वीज हानी सप्टेंबर महिन्यापर्यंत किमान चार टक्क्याने कमी करण्याबरोबरच अकृषक वर्गवारीतील पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांचे अर्ज महावितरणच्या नियमावलीनुसार निकाली काढण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here