पूज्य आचार्य भिसे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक डॉ .निलेश गायकवाड यांना ई-काता प्रात्यक्षिक अंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उपविजेतेपद…

डहाणू – जितेंद्र पाटील

शीतो रियु इप्पोन कराटे डो एकीटो इंटरनॅशनल या संस्थेने ई- काता प्रात्यक्षिक आंतरराष्ट्रीय काता ई -चॅम्पियनशीप 2020 या जागतिक स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केले होते.323 निवडक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या प्रत्यक्षिकांच्या व्हिडीओ ची निवड करण्यात आली होती.

किलिंग पंच या यूट्यूब चैनल वर संस्थेचे अध्यक्ष, आयोजक नरेंद्र चौहान व टेक्निकल कमिटीचे सदस्य यांच्या मार्फत प्रत्येक सहभागी खेळाडूंची काता प्रात्यक्षिक चे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते या जागतिक स्तराच्या स्पर्धेत पब्लिक लाईक्स व आंतरराष्ट्रीय पंचांचे गुण तसेच टेक्निकल कमिटीचे गुणांकन होऊन हा रिझल्ट बनवण्यात आला होता.

त्या अनुषंगाने इंडोनेशिया चे खेळाडू मो. अल फरेबी यांना 680 लाईक्स व पंचांचे गुण मिळून प्रथम क्रमांकाने विजयी तर द्वितीय क्रमांकाच्या 656 लाईक व आंतरराष्ट्रीय पंच टेक्निकल कमिटी यांचे गुण या आधारे उपविजेता पूज्य आचार्य भिसे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक डॉ. निलेश गायकवाड यांना जाहीर करण्यात येऊन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

क्रीडाशिक्षक डॉ. निलेश गायकवाड यांना नुकताच नॅशनल स्पोर्ट्स ऍण्ड फिजिकल फिटनेस बॉर्ड चे अध्यक्ष, अरुणाचल प्रदेश चे माजी क्रीडा मंत्री तथा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पॅडी रिचो यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल’नॅशनल स्पोर्ट्स एक्सलेन्स अवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण खंबायत यांनी कासा ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच हरेश मुकणे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंदाच्या उपस्थितीत त्यांचेअभिनंदन व सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here