मुख्य रस्त्याची झाली ऐसी तैसी…रस्ता खड्ड्यात कि खडा रस्त्यात… काही समजेना? प्रशासक यांनी लक्ष देण्याची गरज…

कुशल भगत

कुटासा गावातील प्रमुख रस्ता हा विठ्ठल मंदिर ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत आहे रस्ता नेहमी वर्दळीचा असून व्यापारी वर्गाने आपली दुकाने थाटली असून जास्तीत जास्त व्यापारीवर्ग आपल्या दुकानातून व्यापार करत असतात तसेच हा गावातील मुख्य रस्ता असल्याने वाहनांची व लोकांची वर्दळ ह्याच रस्त्याने बस स्टॅन्ड पर्यंत असते संबंधित रस्त्यानेच मेडीकल दवाखाने किराणा तसेच राष्ट्रकृत महाराष्ट्र बँक असून बँकेमध्ये आसपासच्या खेडेगावातील लोक येत जात असतात.

त्यामुळे सारखीच गर्दी असते ह्याच रस्त्याने मेडीकल दवाखाने किराणा असून अगदी बँक व मेडीकल दुकानाच्या जवळ मुख्य रस्त्यावरच अगदी मोठा खोलगट भाग तयार झाला असून ह्यात किती महिन्यापासून पाणी साठवून आहे ह्यामधील किचड मधून मोटरसायकली ट्रॅक्टर व शेतीचे बैलबंडी तसेच सर्व लोक आणि मंदिरात जाणारे भक्तगण आपले पाय ह्या दुर्गंधीयुक्त युक्त पाण्यात टाकून जातात ह्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा पायाच्या वर गंभीर परिणाम होत असून,

यामध्ये खाज व पायावर पुरळ उठणे सारखी लक्षणे दिसत आहेत ह्या दुर्गंधीयुक्त पाण्यातून एखादे मोठे वाहन गेले असता त्याचा दुर्गंध अधिकच दूरवर पसरतो तसेच ह्या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तसेच या काळात अनेक आजार या खड्ड्यातून होण्याची शक्यताही भेटता येत नाही सारखे आजार या काळात होण्याची शक्यता असून या काळात नवीन रोगाची भर पडण्याची दाट शक्यता असून अशा या परिस्थितीवर आधीच उपाययोजना करून परिस्थिती हाताळणे गरजेची बाब झाली आहे.

ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी घुगे यांची नियुक्ती झाली आहे अशा या जबाबदार व्यक्तींनी आपली जबाबदारी जनतेसाठी प्रमाणिकपणे पार पाडून जनतेस होणाऱ्या त्रासापासून व रोगराईपासून मुक्त करावे त्यासाठी आवर्जून या बाबीकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे अन्यथा जनतेला गांधीगिरी शिवाय पर्याय नसेल असे जनते मध्ये बोलले जात आहे. जनतेच्या भावना व समस्या आणि कोरोना चा संसर्ग लक्षात घेऊन मुख्य रस्त्याची समस्या त्वरित सोडून रस्ता दुर्गंध मुक्त व अपघात मुक्त करावा अशी येथील जनतेची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here