अहेरीतील आझाद चौक ते दानशूरचा रस्ताने घेतला मोकळा श्वास… प्रशासनाणे हटविले रस्त्यावरील अतिक्रमण…

आज पासून अतिक्रमन हटाव मोहिमेला सुरुवात.

अहेरी:- मागील अनेक महिन्यांपासून शहरातील आझाद चौक ते दानशूर चौकातील रखडलेल्या रस्त्याची व अतिक्रमणाची कार्यवाही तात्काळ करून रस्ता बांधकाम ताबड़तोब बनविन्यात यावे यासाठी लोकप्रतिनिधी, सामजिक कार्यकत्यांनी अहेरीचे तहसीलदार आणि नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते.

त्यानुसार आज शुक्रवार 26 जून रोजी प्रत्यक्षात कार्यवाहीला सुरुवात झाली असून आता सदर रस्ता लवकरच सुस्थितीत बनणार आहे.त्यामुळे आझाद चौक ते दानशूरचौक रस्ताने आता मोकळा श्वास घेतला आहे.

सदर रस्त्यावर अहेरी उपजिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य कार्यालय,अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, न्यायालय, कोषागार, भूमि अभिलेख कार्यालय, विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय, शाळा, महाविद्यालये, एकात्मिक बाल विकास कार्यालय, बँका, सेतु केंद्र आदी महत्वाच्या ठिकाणी याच रस्त्यावरुण ये-जा करावे लागते.

परंतु या रस्त्याची फार मोठी दुर्दशा झाली होती. रस्ता मंजूर होऊनही रस्ता बांधकामास रेंगाळत राहावे लागत होते . त्यामुळे गत आठवड्यात अतिक्रमण धारकांना स्थानिक प्रशासनाकडून नोटिस बजाविन्यात आले होते, आजपासून रस्त्यावरील अतिक्रमण हटविन्यात येत असून मंजूर झालेल्या रस्त्याचे नव्याने निर्माण कार्य होणार आहे.

सदर अतिक्रमण पोलीस कर्मचारी, नगरपंचायतचे कर्मचारी यांचया देखरेखीमध्ये हटविण्यात आले. व यापुढे रस्त्यावर अतिक्रमण करू नये अशा सुचना अतिक्रणधारकांना देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here