आटोरिक्षा रस्त्यावर,पण रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत: धंदा होत नसल्याने रिक्षा चालक चिंतेत…

डहाणू – जितेंद्र पाटील

अनेक महिने कोरोनाच्या संकटात ऑटोरिशा बंद होत्या. त्या मुळे शेकडो ऑटोरिक्षा चालकांची उपासमार होत होती.त्यामुळे कोणतेही काम नसल्याने रिक्षा चालकांनी पोटा-पाण्यासाठी छोटेमोठे धंदे सुरू केले. त्यात भाजीपाला, मासे विकणे, असे वेगळे व्यवसाय करावे लागले.

कारण मागील अनेक महिने सर्व व्यवहारच बंद असल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोणीही बाहेर येत नव्हते.लॉक डाऊन मध्ये अनेक पर प्रांतीय व्यावसायिक आपले दुकान धंदे सोडून आपल्या गावी निघून गेले.त्यामुळे येथील स्थानिक रिक्षा चालक या धंद्यात उतरले.

जेमतेम पोटापाण्यासाठी कमाई झाली तरी ठीक आहे या विचाराने हे धंदे सुरू केले.कासा,चारोटी परिसरात जवळपास 200 ते 250 आटोरिक्षा चालक आहेत,कासा ते चारोटी, कासा ते तलवाडा, चारोटी ते महालक्ष्मी, कासा ते डहाणू, आणि आजू बाजूच्या अनेक गावखेड्यात प्रवासी रिक्षा सुरू असतात. या धंद्यात अनेक कुटुंब आपले पोट भरत आहेत.पण कोरोनाच्या लॉक डाऊन मध्ये खूप मोठा त्रास या रिक्षा चालकांना झाला.

येथील अनेक तरुण नोकऱ्या नसल्याने कर्ज काढून प्रवासी रिक्षा घेतात काही पैसे भरून हप्त्यावर रिक्षा व्यवसाय सुरू करतात. रोज अनेक रिक्षा चालक 400 ते 500 रु कामवित होते कसा तरी पोटापाण्याचा प्रश्न सुटत होता.आता तर सहा महिन्याचे कर्जाचे हप्ते थकले आहेत.घरखर्च चालवताना खुप त्रास पडत आहे.

तरी मागे लॉक डाऊन मध्ये अनेक सामाजिक संस्था नि अन्न धान्य तसेच जीवनाशयक वस्तू वाटप केल्याने आम्हला आधार मिळाला होता असे हे रिक्षा चालक म्हणतात.
सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून सुद्धा रिक्षा चालक पोटा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

घरी बसून पोट भरू शकत नाही.रिक्षा चे हप्ते थकले आहेत.ते भरावे लागतील.पण सद्या पूर्वी सारखे प्रवासी मिळत नाहीत.कारण या भागातील लोकांना सुद्धा आर्थिक टंचाई मुळे कोणी बाहेर खरेदी साठी येत नसल्याने आमचा धंदा होत नाही.
संतोष मोरे -रिक्षा चालक

पाच ते सहा महिने रिक्षा बंद असल्याने गॅरेज मध्ये न्यावी लागली तेथे काम करून आता कुठे धंद्याला लावली आहे.पण सद्या शाळा कॉलेज बंद असल्याने प्रवासी कमी आहेत.त्याच प्रमाणे महालक्ष्मी मंदिर, संतोषी मंदिर बंद असल्याने तेथे जाणारी भक्त मंडळी कमी झाल्याने आमच्या कमाईत घट झाली आहे.म्हणून आम्ही लवकर हा कोरोना संपो आणि पूर्वी सारखे नागरिक बाहेर येवोत अशी देवाजवळ प्रार्थना करीत आहोत.
गणेश सबनीस – रिक्षा मालक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here