परतीच्या पावसामुळे कोगनोळी येथील घर कोसळले…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

गेल्या चार पाच दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून यामध्ये कोगनोळी तालुका निपाणी येथील लोखंडे गल्लीतील दत्तगुरु रघुनाथ लोखंडे यांचे राहते घर कोसळले आहे.गेल्या दोन-तीन दिवसा पासून पडणाऱ्या पावसाने दत्तगुरु लोखंडे यांच्या घराच्या भिंतीमध्ये पाणी जाऊन भिंत गरवल्याने सदर घर कोसळले आहे.

त्यांची परिस्थिती बेताची असुन याघटनेमुळे ते संकटात सापडले आहेत. सुदैवानी या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून घराची कौले,सिमेंट पत्रे, प्रापंचिक साहित्यासह यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

क्षणात घराचे छप्पर होत्याचे नव्हते झाल्याने लोखंडे कुटुंबीयांवर संकट आले आहे.यामुळे त्यांना तात्काळ शासनाकडून मदत करून घरकुल मंजूर करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here