बिलोलीच्या ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थावकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ; संसर्ग नेमका कुठे झाला प्रशासनापुढे मोठे आव्हान…

बिलोली – रत्नाकर जाधव

◆येथील एका बँक व्यवस्थपकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह झाला आसल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाली असून त्यांना नेमका संसर्ग कुठून झाला याचा तपास घेणे आत्ता प्रशासनपुढे आव्हान आहे.

◆कोरोनाच्या प्रारंभापासून बिलोली तालुक्यातील प्रशासनातील प्रत्यक विभागाने आपल्या स्तरावर चोख भूमिका बजावली आहे.त्यामुळे सुरवातीचे दोन महिने कोरोनामुक्त राहिलेल्या बिलोली तालुक्यात केरूर येथील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. परंतु त्याच्या क्वारंटाईन नंतरचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले की निवांत झालेल्या प्रशासनपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.बिलोली येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थपकाचा स्वयाबचा रिपोर्ट काल उशिरा प्राप्त झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

◆या बाबतची माहिती घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लाखमावार यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.कोविडचे बिलोली ग्रामीण रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. सतीश तोटावार व निवासी नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांच्याशी संपर्क केला असता या विषयाला दुजोरा मिळाला आसून नेमका संसर्ग कोणाच्या संपर्कात आल्याने झाला आहे. याचा शोध घेण्यात येत आहे.दरम्यान बँकेतील कर्मचाऱ्यांचे सव्याबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

◆शाखा व्यवस्थापकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बँकेतील चार कर्मचाऱ्यांना क्वारंटाईल करण्यात आले असून त्यांचा थ्रोटचा सव्याब प्रयोगशाळेत
पाठवण्यात आला आसल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॕ.नागेश लखमावार यांनी दिली.दरम्यान बँकेचा परिसर काँन्टेंमेंन्ट भाग म्हणुन प्रवेश बंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here