श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाचे पडसाद अधिवेशनात…

खावटीच्या निर्णयानंतर एक वर्ष होऊनही लाभार्थ्यांना पैसे देणार नसू, तर होणाऱ्या कुपोषणाला जबाबदार कोण ? देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला सवाल.

मुंबई /१० मार्च

श्रमजीवी संघटनेनं मंगळवारी आदिवासी विकास मंत्र्यांच्या निवास स्थानासमोर केलेल्या आंदोलनाचे पडसाद आज अधिवेशनात उमटले. विधानसभेचे विरोधीपक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी खावटीच्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरत, खावटीच्या निर्णयानंतर एक वर्ष होऊनही लाभार्थ्यांना पैसे देणार नसू, तर होणाऱ्या कुपोषणाला जबाबदार कोण ? असा थेट सवाल फडणवीस यांनी सरकारला केला.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी श्रमजीवी संघटनेने आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात ठाणे, पालघर, नाशिक व रायगड मध्ये ४५ ठिकाणी पोलिसांत आदिवासींची फसवणूक केल्याबाबतची तक्रार दाखल केल्याचा उल्लेख देखील केला.

त्यामुळे खावटी योजनेच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी सरकार कोणती पावले उचलते याकडे रज्यातील आदिवासी बांधवांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here