मानवतेच्या विचारांचे संवर्धन हेंच धम्मचक्र प्रवर्तन! ॲड विजयकुमार कस्तुरे, चिखली…

चिखली – अभिमान सिरसाट

आज ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या निमित्ताने स्थानिक – फुले – आंबेडकर – वाटिकेत आयोजित धम्मवंदना व अभिवादन प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ तथा फुले – आंबेडकरी चळवळीतील खंदे कार्यकर्ते विजयकुमार कस्तुरे यांनी वरील विधान केले.

याप्रसंगी धम्मध्वज तथा महामानवांच्या प्रतिमांना, ॲड. कस्तुरे, समता सैनिक दलाचे मेजर तथा १४ ऑक्टोबर, १९५६ च्या, बाबासाहेबांच्या धम्म दीक्षा सोहळ्याचे चक्षुर्वैसत्यम् साक्षीदार आराखबाबा, भीमनगर ऑटो संघटनेचे शाम पवार, सा. आयु. मंडळाचे देवानंद चेंडीलकर सहकुटुंब, अन्याय-भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रदेशाध्यक्षाआयु. संघमित्रा कस्तुरे, चिखली न. पा. च्या अध्यक्षा सौ. प्रियाताई बोंद्रे तथा त्यांचे सामाजिककार्याग्रेसर पती कुणाल बोंद्रे यांनी अभिवादन केले.

या पावन पर्वावर माजी आमदार राहूल भाऊ बोंद्रे, माजी मुख्याध्यापक विद्याधर गवई, वंचित बहुजनचे विनोद कळसकर, नामांतर आंदोलन कार्यकर्ते रमेश साळवे, फुले – आंबेडकरी चळवळीतील जुने सत्याग्रही पांडूरंग अवसरमोल, आयु.विजयकांत गवई, माजी शिक्षणाधिकारी काकडे,ऑटो संघटनेचे वसंत अवसरमोल, कवि सत्य कुटे, हमाल संघटनेचे प्रकाश जाधव, प्रशांत भटकर,

निलेश सुरडकर, विविध सामाजिक संघटना तथा पक्ष – कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थीनी, बचत गट तथा शहरातील बहुतेक नगरातील नागरिक ईत्यादींनी, महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पार्पण केले. धम्मवंदना झाली. कोरोना दक्षता नियम व नि्र्देशांचे पालनासह अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. आयोजन, संचलन व आभार प्रदर्शन ॲड. कस्तुरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here