अत्यंत साधेपणाने केला रावन वधाच्या कार्यक्रम…

रामटेक – राजू कापसे

राममंदिर चे पुजारी मुकुंदराव पंडे यांनी केला प्रतिकारत्म रावनाचा शिरच्छेद रामटेक येथील मानापुर ग्रा प शिवारातील डिगीच्या मैदानात २५ आक्टोबर दसर्याचे दिवशी पंरपरे नुसार रावनाचा शिरच्छेद करण्यात आला गंडमंदीर स्थित राममंदिर लक्ष्मण मंदिराचे पुजारी सुरक्षा रक्षक पापधुपेश्वर मंदिर मार्गाने कार्यक्रम स्थळी पोहचले,

व त्यांनी जय श्रीरामच्या गजरात प्रतीकात्मक रावणाचे शिर धडावेगळे केले नंतर रावणाच्या पुतळा मागेच बनविलेल्या मातीच्या सुरपंखेचे ही शिर उडविले कोरोनाच्या निर्देशा नुसार उपस्थिती आज कमी लोकांनी रामनामाचा गजर होता व उत्साही निशान पुन्हा राम मंदिराकडे माघारी फिरले.

नगराध्यक्ष दिलीप देशमुख, उपाध्यक्ष आलोक मानकर, उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, डी.वाय.यस.पी. नयन आलुरकर, तहसिलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर,४०-५० व्यक्तीची उपस्थिती होती. कोरोनामुळे रामटेकच्या इतिहासात वाहनाने आले. पायर्याने उतरणारे निशान पापधुपेश्वर मंदिर मार्गाने कार्यक्रम स्थळी पोहोचले.रावन दहनाच्या कार्यक्रमानंतर राम भंक्तानी एक दुसर्याला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here