शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारीं मांडणार – माजी मंत्री रमेशचंद्र बंग…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोयाबीन शेतीची पाहणी.

नागपूर – शरद नागदेवे

हिंगणा – सोयाबीन पिकावर आलेल्या रोगाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडू पाहणी केली व सोनेगाव लोधी येथे शेतकऱ्यांची चर्चा केली. यावेळी बोलताना माजी मंत्री रमेश बंग यांनी आपण शेतकऱ्याच्या पाठीशी असून सद्या सोयाबीन पिकावर नवीन रोगांचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

हि समस्या आपण शासन दरबारीं मांडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असे म्हणाले. बंग पुढे म्हणाले कि राज्यात महाविकास आघाडीच सरकार असून सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी नक्कीच उभी राहील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्यां वृंदा नागपुरे, पंचायत समिती उपसभापती संजय चिकटे, नागपूर बाजार समितीचे माजी सभापती अहमदबाबू शेख, जिनींग प्रेसिंग चे अध्यक्ष प्रकाश नागपुरे,खरेदी विक्री सभापती वसंतराव कांबळे , बाबाराव शिद, अनुप नागपुरे, प्रशांत देवतळे, धीरज हांडे, शंकर मडावी, मुकेश इटनकर, चंद्रकांत भोयर,हरीश फंड, चंद्रकांत लोहे, प्रमोद मेंढे, किसना तुरणकर, श्रावण पिने, शेषराव देशमुख, दिलीप नागपूरे, संतोष आगलावेआदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here