शेतरस्त्याचा प्रश्न साेडविण्यासाठी आ. नितीन देशमुख यांना शेतकऱ्यांनी दिले निवेदन…

पातुर – निशांत गवई

पातुर येथे शेतरस्त्याचा प्रश्न साेडविण्याची शेतकऱ्यांच्या वतीने ७ ऑगस्ट राेजी बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांना निवेदन देऊन शेतरस्त्याची मागणी करण्यात आली आहे.पातुर तालुक्यात विविध विकासकामाचे उदघाटन करण्यासाठी आ. नितीन देशमुख पातुरला आले असता शेतकऱ्यांनी निवेदनातुन शेतरस्त्यांची मागणी केली आहे.

पातुर येथील अकोला वाशीम मार्गावरील ३३ के.व्ही उपकेंद्रा मागील मोर्णा डावा कालवा मायनर नं ५ मागील शेतरस्त्यांची मागील काही वर्षांपासूनअत्यंत दुरावस्था झाली असुन शेतकऱ्यांना या रस्त्यांने येजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.या भागात पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण आहे. या रस्त्यातून शेतकऱ्यांना वाट काढणे ही एक कठीण समस्या झाली आहे.

आ. नितीन देशमुख यांनी संबंधित शेत रस्त्याकडे लक्ष देऊन हा शेतरस्ताचे काम पूर्ण करुन शेतकऱ्यांना न्याय मिळुन द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनातुन केली आहे . यावेळी आ. नितीन देशमुख यांनी स्थानिक विकास निधीतुन शेतरस्ताचे काम पूर्ण करुन देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी निवेदनावर शेतकरी दिलीप भगत,निरंजन बोंबटकर, महादेव माहुलीकर, केतन माहुलीकर,प्रकाश वालोकार,गफ्फार सर,अनिल राठोड, बाळु देशमुख,नरेंद्र भगत,जहागीरदार,शंकर काळपांडे,डिगांबर बंड,राखोंडे सर ,सुभाष चुनडे,अशोक चुनडे,गोपाल भाजीपाले,सुरेश राऊत, नितीन बोचरे,गजानन माहुलीकर,मधुकर राखोंडे,प्रभुदास बोंबटकर यांचेसह पत्रकार मोहन जोशी, ऊमेश देशमुख व बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here