सस्ती येथे सरपंच, उपसरपंच पद रिक्त..!

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील आमदार यांचे गाव सस्ती येथील सरपंच पद खोटे दस्तावेज लावून बेकायदेशीररीत्या सभा आयोजित करून करण्यात आल्याची तक्रार ग्रा.पं. सदस्या मीनाक्षी गजानन डाबेराव यांनी २४ फेब्रुवारी २०२१ रोजी केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सस्ती येथील सरपंच व उपसरपंच पद रिक्त करण्याचा आदेश तहसीलदारांना दिला आहे.

ग्रा.पं. सदस्या मीनाक्षी डाबेराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी घेतलेली सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीची सभा बेकायदेशीर आहे. तसेच अध्यासी अधिकाऱ्यांनी गैरअर्जदाराची जात अनुसूचित जमातीमध्ये येत नसून, एसबीसी प्रवर्गात येते. त्यामुळे सरपंच पद नामांकन अर्ज आक्षेप घेतल्यानुसार रद्द करणे आवश्यक होते.

त्यानुसार गैरअर्जदाराच्या जन्म तारखेमध्ये तफावत असून, जातीचे प्रमाणपत्रसुद्धा जन्माच्या अगोदर काढण्यात आल्याचे आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, दि. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी घेतलेल्या सरपंच व उपसरपंच निवडीची विशेष सभा रद्द करून तहसीलदारांनी सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पुन्हा जाहीर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्णय दिला आहे..याबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी, सचिवांना सुद्धा माहितीसाठी आदेश पाठविण्यात आला आहे.

राजकीय दडपण आणून खोटे प्रमाणपत्र जोडून सरपंच पद घेऊन आदिवासी समाजाच्या मीनाक्षी डाबेराव यांना सत्तेपासून वंचित ठेवले होते, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकार समजून निकाल देऊन लोकशाही जिवंत ठेवली. सुनील बंड, ग्रा. पं. सदस्य, सस्ती.

गावतील राजकीय दबाव व खोटे दस्तावेज दाखवून सरपंच पदाची केलेली निवड चुकीची होती. एस.टी. समाजातील महिलेला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला न्याय योग्य असून, या निर्णयाचे स्वागत आहे. नाना अंभोरे, ग्रा. पं. सदस्य, सस्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here