नवेगांव बांध येथील विहरीत पडलेल्या डुक्कर वनविभागाने दीले जीवनदान…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथील शेतकऱ्यांच्या विहीरीत जंगली डुक्कर रात्रीच्यावेळी पडल्याची घटना घडली.सविस्तर वृत्त असे की नवेगावबांध येथील शेतकरी प्रभु लंजे यांच्या शेतातील विहीरीत ऐन रात्री वेळी जंगली डुक्कर पडल्याने वन विभागाला पाचारण करून वनविभागाच्या चमू ने जाळीच्या माध्यमातून जंगली डुक्कराला बाहेर काढले.शेतात पिके असल्याने रात्री ला जंगली डुक्कर पिकाची नासाडी करतात.

यामुळे शेतकरी जंगली वन्य प्राण्यांमुळे त्रासलेला दिसून येत आहे.वन विभागाच्या मिथून चव्हाण,राजेश सूर्यवंशी ,अमोल चौबे,व घरजारे यांनी जंगली डुक्कर बाहेर काढत जीवनदान दिले. वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here