मंगळुरूहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवासी रेल्वेवरच दरड कोसळली…

न्यूज डेस्क – राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने जीवीतहानी झाली आहे, त्यातच पावसाचा कहर, यातच तळीये गावावर दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच मोठी जीवितहानी झाली आहे.गोव्यात एक मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

कर्नाटकमधील मंगळुरूहून मुंबईकडे येणाऱ्या एका प्रवासी रेल्वेवरच गोव्यात दरड कोसळली असून, मातीच्या ढिगाऱ्याखाली रेल्वेचे डब्बे दबले गेले आहेत. या दुर्घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

दरम्यान, माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मंगळुरू जंक्शन – सीएसएमटी एक्स्प्रेस असलेली ही रेल्वे (01134) शुक्रवारी रेल्वे मंगळुरूवरून मुंबईकडे येत असताना, दूधसागर-सोनॉलिम विभागात ती रूळावरून उतरली होती. ज्या कोचवर दरड कोसळली त्यातील प्रवाशांना अन्य डब्यांमध्ये हलवण्यात आले.

सुदैवाने यात कोणतही जीवीतहानी झाली नाही किंवा प्रवासी जखमी देखील झाले नाहीत. वशिष्ठ नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे रेल्वमार्गात बदल करून तो, मडगाव-लोंडा-मिराज असा करण्यात आला होता. अपाघग्रस्त रेल्वेतील प्रवाशांना कुलेम येथे माघीरी पाठवण्यात आले होते.

सततच्या पावासामुळे दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळ मंडलच्या घाट खंडमध्ये दोन ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. पहिली घटना दूधसागर आणि सोनॉलिम स्टेशनदरम्यान घडली, तर दुसरी कारनजोल व दूधसागर स्टेशनदरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here