क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकच पर्याय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – जगदीश (बालु) बावनथडे़…

गोंदिया – तिरोडा तालुक्यातील ग्राम बरबसपुरा येथे मंढई निमित्ताने मराठी लावनीचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते,कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश ( बालु ) बावनथडे़, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविकांत ( गुड्डू ) बोपचे, तुंडीलाल शरणांगत, निलेश खोब्रागडे, रवि पटले, नरेश असाटी सरपंच बरबसपुरा आदीसह पाहुणे मंडळी उपस्थित होते,

जगदीश बावनथडे़ यांनी उपस्थितांना सांगितले कि जर आपल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करु शकतो,काही वर्षांपूर्वी प्रफुल पटेल साहेबांच्या प्रयत्नाने इथं अदानी पावर प्लाँट सारखे मोठे प्रोजेक्ट सुरू झाले रोजगाराच्या सोयी उपलब्ध झाल्या जर आपण पटेल असीच साथ दिली तर भविष्यात संपूर्ण गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा नाव महाराष्ट्रात गाजेल आणी हे कार्य फक्त आणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रफुल पटेल करू शकतात,

मि मागेच आपल्या भाषनात सुकडी़ इथं सांगितले होते की कोरोणा काळात आपल्या संपूर्ण देशाची खुप वाईट परीस्थिती झाली होती सर्वांनी आप आपल्या परिने एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य केले होते मात्र गोंदिया-भंडारा जिल्ह्यात प्रफुल पटेल यांनी विषेश लक्ष देत मदत केली मग ते मेडीसिन असो किंवा रेमदेसिवीर इंजेक्शन असो अथवा राषण पोहचवण्या पर्यंत प्रत्येक मदत केली,

भविष्यातही प्रफुल पटेल व राजेंद्र जैन व संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसेवा करायला रांगेत सर्वात सामोरच दिसेल असे ते म्हणाले व सर्वांना दिवाळी व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here