सर्वसामान्य जनतेला ज्ञान शिकवणारेच अधिकारी अज्ञानी? नगरपरिषद कार्यालयात अधिकारीच बिना माक्स :- कसा रोखला जाणार कोरोना…

दर्यापूर – किरण होले

अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. काल दिवसभरात अमरावती जिल्ह्यात तब्बल 900 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी आयुक्त, जिल्हाधिकारी विविध नियम आखून देत आहे.

बिना माक्स शहरात फिरत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 21 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात संपूर्ण तालुका ठिकाणी रुग्ण संख्या वाढू नये यासाठी शहरातील प्रतिष्ठाने ही पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

व जो कोणी बिना माक्स वाहन घेऊन आढळल्यास त्याचे वाहने जप्त करण्याची सुद्धा आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दर्यापूर नगरपालिका प्रशासन, व महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात धडक कारवाई सुरु आहे.

व २१ फेब्रुवारीपासून आज पर्यंत तब्बल बिना माक्स फिरणारे व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणारे अशा लोकांकडून 70 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या या धडक मोहिमेला घाबरून जनतेने मास घालने सुरू केले आहे.

परंतु दुर्दैवाची बाब अशी की सर्व सामान्य जनतेला न्याय शिकवणारे अधिकारी हे अज्ञानी असल्याचे चित्र नगरपालिका कार्यालयात पुण्यनगरी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये समोर आले आहे. दर्यापूर नगरपालिका कार्यालयांमध्ये सुमारे शेकडोंच्या संख्येने अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहे.

या कार्यालयात नगरपालिका क्षेत्रातील जनता ही आपल्या कामानिमित्त दररोज ये जा करते. परंतु नगरपालिका कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, बांधकाम अधिकारी, व अन्य विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या तोंडाला कामकाज करत असताना कुठल्याही प्रकारचे माक्स नसल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे जर नगरपालिका कार्यालयातच कोरोना चा विस्पोट झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न आता सर्वसामान्य जनता उपस्थित करीत आहे. सर्वसामान्य जनतेला कायद्याचे पालन करायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांनीच सर्वप्रथम कायद्याचे पालन करावे तरच आपण या कोरोना महामारी पासून वाचू शकेल .

दर्यापूर नगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी आपले पथक नेमून शहरात सर्वसामान्य जनतेला व छोट्या व्यावसायिकांना दबंग गिरी करून अतिशय उद्धट वागणूक देत आहे . आधी अधिकाऱ्यांनीच कायद्याचे पालन करावे व नंतर सर्वसामान्य जनतेला कायद्याचे ज्ञान शिकवावे .

विनय गावंडे ,जिल्हाध्यक्ष बांधकाम व असंघटित कामगार संघ

जिल्हाध्यक्ष बांधकाम व असंघटित कामगार संघनगरपालिका तिजोरीत जास्तीत जास्त रक्कम जमा व्हावी या दृष्टिकोनातून शहरातील गोरगरीब व्यवसायिकांना वेटीस धरण्याचे काम नगरपालिका करीत आहे .जर नगरपालिका कार्यालयातील अधिकाऱ्यांना च तोंडाला माक्स, व कामकाज करत असेल तर जनतेला न्यान शिकवण्याचे कुठलीही अधिकार अशा कर्मचाऱ्यांना नाही. याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
मनोज तायडे
मनसे ,तालुकाध्यक्ष दर्यापूर

जर कार्यालयात अधिकारी हे एकटे बसले असेल तर त्यांनी माक्स घातले नाही तरी चालेल परंतु त्यांच्या समोर कोणी दुसरा व्यक्ती बसलेली असेल तर दोघांच्याही तोंडाला माक्स असणे अनिवार्य आहे. जर अधिकारांचा तोंडाला माक्स नसेल असे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

गीता वंजारी, मुख्याधिकारी दर्यापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here