नागपुरात यावेळी बसपाच्या महापौर…शाहू जयंती दिनी बसपाची घोषणा…

नागपूर – शरद नागदेवे

बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने आज महाराष्ट्र प्रदेश महासचिव नागोरावजी जयकर व प्रदेश कार्यालय सचिव उत्तम शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या विभागीय कार्यालयात बहुजन समाज पार्टीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचा समारंभ आयोजित केला होता. या समारंभात नागोराव जयकर यांनी यावेळी नागपुरात बसपाचा महापौर बनेल व त्यासाठी कार्यकर्त्यांनी बहुजन समाजाला शासक बनविण्यासाठी कार्याला लागावे असे आवाहन कार्यकर्त्यांना याप्रसंगी केले.

हल्ली देशात केंद्र व राज्य सरकार च्या वतीने मागसवर्गीयावर व त्यांच्या कर्मचार्यवर अन्याय होत असून तो दूर करायचा असेल तर शाहूंच्या आरक्षण धोरणानुसार बहुजनांनी भाजप-काँग्रेस सोडून बसपा ला साथ द्यावी असे आवाहन बसपा चे प्रदेश सचिव उत्तम शेवडे ह्यांनी यावेळी केले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 ला छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करावी असा आपल्या अनुयायांना संदेश दिला होता. तोच संदेश घेऊन बहुजन समाज पार्टीने आज त्यांच्या भव्य जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी नागपूर जिल्हा प्रभारी नितीनजी शिंगाडे, विजयकुमार डहाट, नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीपजी मेश्राम, नागपूर शहर अध्यक्ष इंजिनीयर राजीव भांगे, मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, आशीनगर झोन सभापती वंदनाताई चांदेकर यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पक्ष नेते गौतम पाटील यांनी तर समापन प्रीतम खडतकर यांनी केला.

याप्रसंगी नगरसेविका वैशालीताई नारनवरे, महिला नेता सुनंदाताई नितनवरे, रंजनाताई ढोरे, बबीताताई डोंगरवार, सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे, जिल्हा सचिव सागर लोखंडे, विलास पाटील, अभय डोंगरे, गौतम गेडाम, नरेंद्र वालदे, संजय सोमकुवर, महिपाल सांगोळे, शिवपाल नित्नवरे, पंकज पोहरकर, मनोज निकाळजे, अभिलेश वाहने, रोषण शेंडे, शशिकांत मेश्राम, सुरेश गजभिये, चंद्रशेखर पाटील, ताराचंद गोडबोले,

राजकुमार बोरकर, रुपराव नारनवरे, चंद्रशेखर कांबळे, गौतम मेश्राम, सुरेश मानवटकर, सतीश शेळके, नितीन वंजारी, मुकेश मेश्राम, प्रवीण पाटील, सदानंद जामगडे, महेश शहारे, योगेश लांजेवार, विलास सोमकुवर सादाब खान आदींनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमालायावेळी ऋषिकेश चौरे या सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या असंख्य सहकाऱ्या सोबतपक्ष प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here