पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील ग्राम विवरा येथिल रोपवाटिका मध्ये शासनाची दिशाभूल करून कागदोपत्री मजूर दाखवून सामाजिक वनीकरण चे किशोर पिंजरकर यांनी लाखो रुपयेचि माया जमा केली असून या वनीकरण मध्ये बिनधास्त पणे खुलेआम जुगार सुरु असल्याचि खडबड जणक बाब निर्देशनास आली आहे.
विवरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका मध्ये चुकीच्या पद्धतीने मस्टर काढून शासनाचि लूट होत असून रोज कामावर असणाऱ्या मजूरापैकी 30% मजूर हे कामावर नसतानाही कागदोपत्री या मजूरा चि उपस्थिती दाखविण्यात येते तसेच त्यांच्या नावावर पैसे काढण्यात येत असून व रोजगार हमी योजने अंतर्गत प्रत्येक जॉबकार्ड धारक रोजगार मजुरास किमान नव्वद दिवस रोजगार मिळावा या उद्देशाने शासनाने हि योजना राबविण्यात येत आहे.
मात्र किशोर पिंजरकर हे आपल्या मर्जीतील मजुरांना व महिलांनाच कामावर ठेवत असून काही मजूर रोपवाटिका जेव्हापासून सुरु झाली तेव्हा पासून ते आजवर मजुरी वर असल्याचे तक्रारकरत्या चे म्हणणे आहे गावातील अनेक महिला, पुरुषनि वेळोवेळी कामाची मागणी करून सुद्धा पिंजरकर हे आपल्या मर्जीतिलच नागरिकांना कामावर ठेवतात तसेच रोपवाटिका मधील रोपे परस्पर विक्री करीत असून लाखो रुपयेचा मलिदा पिंजरकर यांनी लाटला असून या रोपवाटिका मध्ये साठ,
सत्तर वर्ष वयाच्या महिला व पुरुषांना कामावर दाखवून खोटे मस्टर काधुन मजुरी काढण्यात आली असून पिंजरकर एवढ्यावरच न थांबता मृत्यू झालेल्या महिलेच्या नावावरून सुद्धा मजुरी लाटली असून याप्रकारे पिंजरकर हे शासनाचि दिशाभूल करून लाखो रुपयेनि शासनाला चुना लावीत असून याबाबत तक्रारकरत्या कडे अनेक पुरावे असल्याचि बाब तक्रारीमध्ये केली असून,

तसेच रोपवाटिका मध्ये एका खोलीत खुलेआम जुगार सुरु राहत असून नर्सरी मध्ये अवैध धंदे सरेआम सुरु आहेत पिंजरकर यांची मनमानी एवढ्यावरच थांबली नसून विवरा फाटा ते जांभरून रस्त्याच्या बाजूला रोपे लावण्यात आली असून या रोपाच्या वरून विद्युत वाहिनी गेलेल्या असून काही वर्षात हि झाडे मोठी झाल्यास नाईलाजाने हि झाडे तोडावि लागणार असून शासनाला यामुळे लाखो रुपयेचा भुर्दंड नाहक सहन करावा लागणार आहे.
किशोर पिंजरकर यांची संपूर्ण चौकशी करून त्याच्या जवळून रिकवरी करण्यात यावी अशी मागणी तक्रारकरते दिनेश पजइ यांनी केली असून किशोर पिंजरकर यांच्या वर वरिष्ठ काय कारवाई करतात कि पाठीशी घालतात याकडे विवरावासियांचे लक्ष लागले आहे.