अकोला – अकोट तालुक्यातील येणाऱ्या कावसा प्राथमीक आरोग्य केंद्रांत आज रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यासाठी मिंटीग आयोजीत केली होती मिटींग सुरु असताना काही कार्यर्कत्यांनी कोवीड सेटंरची पाहणी करत असताना आरोग्य केंद्रांतील एक परीचारक काॅरनटाईन वार्डातच मद्यपान केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला होता त्याला तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समक्ष उभे केले असता कावसा प्राथमीक आरोग्य केंद्रांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.
रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व पदअधीकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत जर का असे प्रकार घडत असतील तर तालुका आरोग्य अधिकारी यांना निलंबित करा करा अशी मागणी रुग्ण कल्यान समीतीच्या पदअधीकारी यांनी लावुन धरली होती व परीचारकावर लवकरात लवकर पोलीस कारवाई करावी अशी मागणी केली.