परतवाडा येथील कुख्यात गुंडास एम.पी.डी.ए. अक्ट अन्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द…

फोटो -सौजन्य गुगल

अमरावती – गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता परतवाडा शहरातील रवि नगर, पतरवाडा, जि.अमरावती येथे राहणारा कुख्यात गुंड राहूल उर्फ कालू घनश्याम यादव, वय २५ वर्ष याला एम.पी.डी.ए. अक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द केले आहे. याच महिन्यातील अमरावती पोलीस अधीक्षकांची दुसरी कारवाई.

सदर व्यक्तीवर यापुर्वी खून,खूनाचा प्रयत्न,इच्छापूर्वक जबर दुखापत करणे, गूप्तपणे व गैरपणे एखादया व्यक्तीला परिरूध्द करण्याकरीता अपनयन किंवा अपहरण करणे, बलादग्रहण करण्याकरीता एखादया व्यक्तीला सती पोहचविण्याची भिती घालणे, जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दूखापत करणे,प्राण घातक हत्यारानिशी सज्ज होवून दंगा करणे,शिवीगाळ,धमकी देणे,बेकायदेशिर रित्या शस्त्र बाळगणे, अनूसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदया अंतर्गत गंभीर स्वरूपाचे अपराध केलेले आहेत असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक,हद्पार कारवाई करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करुन सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड राहूल उर्फ कालू घनश्याम यादव, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांना सादर केला होता.

मा. जिल्हादंडाधिकारी, पवनीत कौर यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वत:चे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अमरावती जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. १९/११/२०२१ रोजी पारीत केला. मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अमरावती यांचे आदेशावरून राहूल उर्फ कालू घनश्याम यादव याचा तात्काळ शोध घेवुन त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक १९/११/२०२१ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.

सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अविनाश बारगळ सा अपर पोलीस अधीक्षक, शशिकांत सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक कार्यालय येथील पोलीस निरीक्षक तपन कोल्हे,पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोहेकॉ अमोल देशमूख,यांनी तसेच पो.स्टे. परतवाडा येथील पोलीस निरीक्षक संतोष टाले, तसेच पो.स्टे. तील कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले. अमरावती ग्रामीण जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती संकलीत करण्यात येत असून त्यांचेवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here