नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सौ मोहिनी विजय येवनकर यांनी आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महापौर कक्ष बैठक हॉल येथे मनपा आरोग्य अधिकार्यांची आढावा बैठक घेतली.
माननीय महापौर यांनी कोव्हीड सेंटर येथे रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत, ज्या रुग्णांना बेडची नितांत आवश्यकता आहे अशा रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करून देण्याबाबत व येणाऱ्या काळात कोव्हीड रूग्ण वाढू नये याबाबत उपाययोजना करण्याच्या सुचना महापौर यांनी बैठकीत दिल्या.मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी महापालिकेच्या वतीने कोव्हीड रूग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली.
यावेळी उपमहापौर खान म. मसुद अहेमद खान, गटनेता विरेंद्र सिंह गाडीवाले, उपायुक्त अजितपालसिंह संधू, विजय येवनकर, प्र. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बद्दीयोद्दीन, स. सदस्य किशोर स्वामी, हे यावेळी उपस्थित होते.