बहुचर्चित कुकॉइन प्रस्तुत चिंगारी स्टार कॉन्टेस्टची उत्सुकता शिगेला…

२ कोटी रुपयांची गारी टोकन्स जिंकण्यासाठी चुरस, १५ फेब्रुवारीसाठी क्रिएटर्स सज्ज…

चिंगारी अॅपतर्फे चिंगारी स्टार स्पर्धेची नवी तारीख जाहीर झाली आहे. या स्पर्धेत क्रिएटर्स आणि युझर्स सहभागी होऊ शकतात आणि कोट्यवधींची $GARI टोकन जिंकण्याची त्यांना संधी मिळणार आहे. एका विजेत्याला तब्बल १ कोटी रुपयांची $GARI टोकन प्राप्त होणार आहे.

$GARIचे पाठबळ लाभलेल्या भारतातील चिंगारी या #1 शॉर्ट व्हिडियो अॅपतर्फे चिंगारी स्टार या रोमांचक स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या अॅपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२२ या कालावधीतील भारतभरात क्रिएटर्स आणि युझर्सना सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन क्रिएटर्स आणि युझर्सना तब्बल दोन कोटी रुपये मूल्य असलेली $GARI टोकन जिंकण्याची संधी आहे. या टायटलसोबतच चिंगारी स्टारला $GARIचे पाठबळ लाभलेले रु.१ कोटीचे रोख पारितोषिक मिळणार आहे.

क्रिएटर्सच्या कम्युनिटीकडून चिंगारीला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाचा विचार करता शीर्षक प्रायोजक कुकॉइनने (Kucoin) सादर केलेल्या चिंगारी स्टार कॉन्टेस्टच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.  क्रिएटर्स त्यांच्या चिंगारी प्रोफाइल्स भक्कम करण्यासाठी, फॉलोअर्स वाढविण्यासाठी आणि सध्याच्या अॅपवर स्टार बॅजेससाठी अर्ज करण्यासाठी १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीचा उपयोग करून घेऊ शकतात.  भारतातील उदयोन्मुख कलाकार शोधूणे आणि यांना चिंगारी स्टार ऑफ द इयर म्हणून या प्लॅटफॉर्मवरून प्रमोट करणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.

चिंगारी स्टार कॉन्टेस्टला कुकॉइनचे एक्स्क्लुसिव्ह प्रायोजकत्व लाभले आहे. कुकॉइन ही जगातील आघाडीची क्रिप्टोकरन्सी असून हे चलन सप्टेंबर २०१७ मध्ये लाँच करण्यात आले. कुकॉइनला पिपल्स एक्स्चेंज म्हटले जाते आणि कुकॉइन हे सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आले आहे. यात जगभरातील २०७ देश व प्रदेशांमधील १० दशलक्ष युझर्ससाठी सध्या स्पॉट ट्रेडिंग, मार्जिन ट्रेडिंग, P2P फियाट ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग, स्टेकिंग, मायनिंग आणि लेंडिंग उपलब्ध आहे. प्रथम क्रमांकाचे अल्टकॉइन एक्स्चेंज असलेले कुकॉइन ६०० ट्रेडेबल अॅसेट्स आणि १००० हून अधिक ट्रेडिंग पेअर्सना सपोर्ट करते. त्याचप्रमाणे कुकॉइन युरोप, एसईए आणि इतर प्रदेशांमधील २० लोकल कम्युनिटी स्थापन केल्या आहेत, ज्यामुळे युझर्सना अत्यंत स्थानिकीकरण झालेल्या सेवा व सपोर्ट प्राप्त होतो.

आजचे  कंटेंट क्रियेटर हे कलाकार,  कथाकथनकार, एखाद्या विषयातील तज्ञ आहेत जे शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मसाठी उत्तम दर्जाचा कंटेंट तयार करत आहेत.  क्रिएटर आणि प्रेक्षक यांच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ फॉरमॅट हा सर्वाधिक खिळवून ठेवणारा फॉरमॅट ठरला आहे.  प्रेक्षकांच्या या बदलत्या आवडीनिवडीवर भर देत आणि ताज्या व वैशिष्ट्यपूर्ण कन्टेन्टसाठी असलेली मागणी लक्षात घेत चिंगारीने ‘चिंगारी स्टार कॉन्टेस्ट’ जाहीर केली.

या स्पर्धेत सहा भारतातील दुर्गम कानाकोपऱ्यातील उदयोन्मुख गुणवंतांना शोधणे आणि त्यांना स्वतःचा तसेच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कौशल्याचा प्रचार करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे जेणेकरून ते देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत शकतील, हे अॅप तयार करणाऱ्यांचे उद्दिष्ट आहे.  युझर्सनी खाली दिलेल्या सोप्या पायऱ्यांचा अवलंब करायचा आहे आणि त्यांना आकर्षक रोख बक्षिसे आणि चिंगारी स्टार होण्याची संधी प्राप्त होणार आहे.

 पायरी १ –  चिंगारीवरील तुमची प्रोफाईल पूर्ण करा

 पायरी २ –  अॅपवर पाच व्हिडिओ अपलोड करा

 पायरी ३ –  चिंगारी स्टार होण्यासाठी अर्ज करा

प्रत्येक क्रिएटरने त्यांच्या कन्टेन्टसाठी मिळविलेल्या मतांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल. मार्च २०२२ मध्ये निकाल जाहीर करण्यात येतील.

चिंगारी अॅपचे सहसंस्थापक आणि सीईओ श्री. सुमित घोष म्हणाले, “ या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला आमच्या सध्याच्या क्रिएटर्सना ताजा व नवीन कन्टेन्ट आणण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. तसेच नवीन क्रिएटर्सना आमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन हा प्लॅटफॉर्म जाणून घेण्यासाठी,  व्हिडिओ तयार करण्यासाठी आणि $GARI  टोकन सह उत्पन्न मिळविण्यासाठी निमंत्रित करायचे आहे.

आतापर्यंत क्रिएटर्स कडून मिळालेल्या भरघोस प्रतिसाद पाहता ही स्पर्धा १५ फेब्रुवारीपासून सुरू करणे समयोचित आहे. यामुळे मिळालेल्या अतिरिक्त कालावधीचा वापर करून युझर त्यांची चिंगारी अॅप वरील प्रोफाइल अधिक सक्षम करू शकणार आहेत आणि या प्लॅटफॉर्मवर आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या क्रिएटर्सशी स्पर्धा करून त्यांना जिंकण्याची न्याय्य संधी प्राप्त होईल.

कुकॉइनचे सीईओ जॉनी ल्यू म्हणाले, “क्रिप्टो क्षेत्रातील अॅक्सिलरेटर आणि सहभागी म्हणून कुकॉइन ही स्पर्धा सादर करण्यासाठी चिंगारीसोबत सज्ज झाली आहे. या निमित्ताने अदिक युझर्सना क्रिप्टो जगाची माहिती होईल, समजून घेता येईल आणि सहभागी होता येईल. यामुळे ब्लॉकचेनच्या व्यापक पातळीवरील स्वीकारार्हतेस वेग येईल.”

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी क्रिएटर्समधील उत्साह आणि जोश पाहून आम्ही रोमांचित झालो आहोत.आमचा निकोप स्पर्धेवर विश्वास असल्यामुळे ही स्पर्धा १५ फेब्रुवारी पासून सुरु करणे योग्य आहे जेणेकरून क्रिएटर्सना जिंकण्यासाठी भक्कम पाया रचण्याची समान संधी प्राप्त होईल. 

चिंगारी स्टार हे टायटल जिंकल्यास विजेत्यांना पुढे अनेक संधी मिळतील. $GARI पाठबळ लाभलेल्या रोख पारितोषिकामुळे आम्हाला क्रिएटर्स आणि प्रेक्षकांकडून अधिक प्रतिसाद मिळेल तसेच त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.”, असे मत चिंगारी अॅपचे  सहसंस्थापक आणि सीओओ दीपक साळवी यांनी व्यक्त केले.

१५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२२ या कालावधीत चिंगारी स्टार स्पर्धा लाइव्ह असेल. मार्च महिन्यात या स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा होईल. त्यानंतर मुंबईत आयोजित एका भव्य कार्यक्रमासाठी विजेत्यांना निमंत्रित करण्यात येईल.  प्रत्येक चिंगारी युझरला त्यांच्या आवडत्या क्रिएटरला व्होट करण्यासाठी दर दिवशी ५ व्होट मिळतील . या अॅपवर सक्रियपणे व्होटिंग करणाऱ्या,   व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ खर्च करणाऱ्या हजारो युझर्सना आकर्षक रोख बक्षीस मिळवण्याची संधी आहे.

 या स्पर्धेव्यतिरिक्त चिंगारी युझर्स ओरिजीनल व्हिडीओ तयार करू शकतात आणि सहा फेब्रुवारीपासून $GARI टोकन मिळवू शकतात.

 अधिक माहितीसाठी युझर्सनी https://star.chingari.io/  या वेबसाईटला भेट द्यावी

व्होट्सच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल

स्पर्धेच्या कालावधीमध्ये जे युझर्स दररोज एक तास अॅपवर व्हिडीओ पाहतील अशा ५००० नशीबवान युझर्सना $GARI  टोकनचे पाठबळ लाभलेले रु.५०० चे रोख पारितोषिक मिळणार आहे. तिसऱ्या आठवड्यापर्यंत १००० युजर्सना दर आठवड्याच्या शेवटी बक्षीस मिळेल शिल्लक २००० युजर्सना स्पर्धेच्या शेवटी बक्षीस मिळेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here