‘आमदार आपल्या गावी’ या आभिनव उपक्रमाची मुरडा या गावापासून सुरुवात, जे बोलले ते करुन दाखविले – आ.आशिष जयस्वाल…

रामटेक – राजु कापसे

दि.१४ जानेवारी २०२२ रोजी “आमदार आपल्या गावी” या आमदार आशिष जयस्वाल यांच्या अभिनव योजनेची आदिवासी दुर्गम मुरडा या गावापासून सूरुवात केली.या गावी राञभर मुक्काम करुन गावातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत समस्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन गावकर्‍यांना दिले.तसेच संपूर्ण गावकर्‍यांसोबत जेवणही केले.

मुरडा येथिल नागरिकांना दिलेल्या शब्दानूसार दि.२१ जानेवारी २०२२ रोजी संपूर्ण प्रशासकीय अधिकार्‍यासंह मुरडा या गावाला भेट दिली.यावेळी संजय गांधी निराधार योजनेतील शेवंता सुखदेव धुर्वे,रेखा सहदेव सलामे,चंद्रभागा गणबा राऊत,पोर्णिमा घनश्याम श्रीरामे,बिंदाबाई कचरु हजारे,वच्छला जगण कोकोडे यांना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंजुरी पञ देण्यात आले.

तसेच गावातील नागरिकांना राशन घेण्यासाठी ६ कि.मी. उमरी या गावी जावे लागत होते.हा ञास कमी करण्यासाठी उमरी येथिल रेशन दुकानदारांनी प्रत्येक महिण्याला मुरडा या गावी जावून राशन दयावे.असे आदेश आमदार आशिष जयस्वाल यांनी पुरवठा अधिकार्‍यांना दिले.

“आमदार आपल्या गावी” हा अभिनव उपक्रम तालूक्यातील गावा – गावापर्यंत पोहचण्याचा व शेवटच्या घटकांपर्यंत सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, कुणीही योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये हाच माझा ध्यास आहे. मी जे केले ते माझे कर्तव्य आहे.

लोकांनी मला मोठ्या अपेक्षेने मतदान केले आहे.असे आ.जयस्वाल यावेळी म्हणाले.यावेळी जि.प.सदस्य संजय झाडे,माजी सरपंच बाल्या मासूरकर,अमोल खंते,संतोष साकोरे,पुरवठा अधिकारी जाधव,खैरकर यांचेसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here