“देर आये, दुरुस्त आये” सामाजिक एकीकरणासाठी चिखली तालुक्यातील नेत्यांनी बांधली वज्रमूठ…!

बुलढाणा – अभिमान शिरसाट

आंबेडकरी चळवळीची अवस्था आज रोजी पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे झाली असून गल्ली ते दिल्ली पर्यंत असंख्य तुकडे या चळवळीचे झाले आहेत. चळवळीच्या या झालेल्या तुकड्या मुळे पुढील येणारी पिढी ही आज रोजी च्या नेत्यांना कदापि माफ करणार नाही ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन तथा या गोष्टीचे गांभीर्य ओळखून,

चिखली तालुक्यातील नेत्यांनी समाज एकसंघ करण्यासाठी कंबर कसली असून सर्वांनी राजकीय व वैयक्तिक मतभेद विसरून सर्वांनी समाजाच्या हितासाठी उत्कर्षासाठी एकत्रित एका विचाराने ,एका दिलाने काम करण्याचे चिखली स्थित तारा विश्राम गृहावर झालेल्या बैठकीत सर्वानुमते ठरविले.

याबाबत सविस्तर असे की, आंबेडकरी चळवळीची वाताहत पाहता युवा नेते भाई सिद्धार्थ पैठणे व भाई विजय गवई सह अनेकांच्या मनाला या गोष्टीची सल ही बोचत होती आणि येणारी पिढी ही गटातटात विभागलेल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना कदापिही माफ करणार नाही या गोष्टीचे गांभीर्य ओळखून त्यांनी ठरवले की,

वरिष्ठ नेते एकत्रित येतील की नाही हा विचार आता आपण सोडून द्यायचा. परंतु ग्राउंड लेव्हलवर सामाजिक काम करत असताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडीअडचणी चा विचार करून सर्व आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांना सामाजिक फूट न दाखवता एकसंघ राहण्याचे आवाहन करून सांगितले की, राजकीय मतभेद असू द्या, परंतु सामाजिक मनभेद कदापि नसू द्या.

या सामाजिक एकीकरणाच्या बैठकीला तालुक्यातील तथा जिल्ह्यातील चळवळीमध्ये काम करणारे ज्येष्ठ नेते तथा सर्वच गटातटाचे व पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी भाई प्रदीप अंभोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अनेक आठवणींना उजाळा देऊन सांगितले की, नामांतराच्या चळवळीचे रणसिंग हे बुलढाणा जिल्ह्यातून फुंकल्या गेले. जिल्ह्याला आंबेडकरी चळवळीचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे.

आजच्या कार्यकर्त्यांना चळवळीचा रेडीमेड वारसा मिळालेला आहे. या मिळालेल्या वारशाचे सामाजिक काम करते वेळेस सर्वांनी प्रांजळ भावना ठेवून काम करावे असे आवाहन भाई प्रदीप अंभोरे यांनी केले.तालुका स्तरावर तरी सर्व कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून वरिष्ठ नेत्यांपुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले व लवकरच सामाजिक एकीकरणाचा नवा प्लॅटफॉर्म तयार करून सर्व गट-तट विसरून सर्वांनी एकत्रित सामाजिक काम करण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीला सामाजिक एकत्रीकरणाची संकल्पना मांडणारे भाई सिद्धार्थ पैठणे, भाई विजय गवई सह भाई प्रदीप अंभोरे ,प्रशांतभैय्या डोंगरदिवे, अँड. मनमोहन घेवंदे, दादाराव सुरडकर ,भाई सिद्धांत वानखेडे, हिम्मतराव जाधव, भाई सिद्धार्थ छडीदार, संजय धुरंधर ,बाळू भिसे ,गौतम माघाडे ,प्रशांत भटकर, गजानन गवई, शाहीर घेवंदे ,दीपक साळवे ,रवींद्र वाकोडे ,राजू पैठणे,

विनोद कळसकर ,डॉ संजय जाधव सह तालुक्यातील सर्वच आजी-माजी ज्येष्ठ-श्रेष्ठ पदाधिकारी तथा कार्यकर्ते या सामाजिक एकीकरणाच्या बैठकीला उपस्थित होते. अखेर सर्वच कार्यकर्ते तथा पदाधिकारी देर आये…..दुरुस्त आये…. यांना सामाजिक एकीकरणाचे महत्त्व तरी कळाले. वरिष्ठ पुढारी तथा नेते या कार्यकर्त्यांचा आदर्श तथा बोध घेतील का…? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here