भारत-श्रीलंका यांच्यातील विश्वकप स्पर्धेतील “तो” सामना फिक्स होता…श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांचा खळबळजनक दावा

डेस्क न्यूज – २०११ मध्ये भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान मुंबईच्या वानखेडे मैदानावर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना झाला. मात्र, हा सामना फिक्स होता, असा खळबळजनक दावा श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला आहे.

ते श्रीलंकेतील न्यूज फर्स्ट वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. दरम्यान, श्रीलंकेचा माजी खेळाडू आणि २०११ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या महेला जयवर्धनेने या आरोपांची खिल्ली उडवली आहे. श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी केलेल्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.

माजी क्रीडामंत्री यांनी केलेल्या दाव्यानंतर श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा याने आपले मत व्यक्त केले आहे. World Cup २०११ च्या फायनलमध्ये संगाकारा जिंकूनही दुसऱ्यांदा उडवला होता टॉस “सामना फिक्स असल्याचा दावा केल्यानंतर तो खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना पुराव्यांची गरज भासेल.

सुरक्षा यंत्रणा, लाचलुचपच प्रतिबंधक विभाग आणि ICC हे सारे पुरावा दिल्यानंतरच याबाबत नीट चौकशी व तपास करू शकतात”, असे संगकाराने ट्विट करत सांगितले.

स्थानिक टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अल्थथॅमगे म्हणाले की अंतिम निश्चित झाले होते. 275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने गौतम गंभीरच्या 97 आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 91 धावांच्या मदतीने हे विजेतेपद जिंकले. त्यावेळी क्रीडामंत्री असलेले अल्थगॅमगे म्हणाले, आम्ही वर्ल्ड कप २०११ विकला होता. मी क्रीडामंत्री असतानाही मी हे बोललो होतो.

जयवर्धनेनेदेखील हा दावा खोडून काढत खोचक ट्विट केले होते. “निवडणुका जवळ आल्या आहेत का?? सर्कस सुरु झाल्यासारखं वाटतंय…नावं आणि पुरावे कुठे आहेत??”, अशा आशयाचं ट्विट करत माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपांवर त्याने आपली प्रतिक्रिया दिली होती.

त्यावेळी, श्रीलंकेचा कर्णधार संगकाराने भ्रष्टाचारविरोधी तपासणीचा पुरावा देण्यास सांगितले आहे. संगकारा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “या दाव्याच्या सखोल चौकशीसाठी त्यांचा पुरावा ‘आयसीसी आणि लाचलुचपत प्रतिबंधक आणि सुरक्षा युनिटकडे नेण्याची गरज आहे.’

काय आहे श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्र्यांचा दावा?

“२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असताना हा प्रकार घडला आहे. मी हे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो आहे. पण देशासाठी मी यामध्ये कोणाचाही नाव घेणार नाही.

भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही. पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली”, असा दावा त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here