पातूर तालुक्यातील कोसगाव येथील घटना देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या दोन युवकांना अटक…

पातूर – निशांत गवई

पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोसगाव येथील दोन युवक जवळ देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहीती स्थानीक गुन्हे शाखेला मिळाली.सदर माहितीवरून LCB ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांनी 3 डिसेंबरच्या मध्यरात्री सापळा रचुन कोसगाव ते माळराजुरा रस्त्यावर रात्री 3 वाजता दुचाकीने येणाऱ्या दोन युवकांना थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ देशी कट्टा आढळून आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी परशराम पांडुरंग करवते रा. कोसगाव व आरोपी सुभाष रामजी शेळके रा. गांगलवाडी यांच्याकडून 1 देशी कट्टा व हिरो होंडा मोटार सायकल क्र. MH 30 BE 0054 असा अंदाजे किंमत 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन दोन्ही आरोपींना अटक करुन दि 4 डिसेंबर रोजी पातुर दीवानी न्यायालयात हजर केले.पुढील तपास ठाणेदार हरीष गवळी यांच्या मार्गदर्शन खाली जमादार राम आंबेकर व हेड काँन्सेटबल सचीन पिंगळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here