पारंपारिक पद्धतीला फाटा देत साध्या पद्धतीने पार पडला आदर्श विवाह…

मुर्तिजापुर : यंदा या कोरोनामुळे उदयास आलेली नवीन लग्न पद्धती समाजाला हितकारक ठरत आहे.लग्न म्हटले कि मोठा वाजागाजा अफाट खर्च त्यात मारवाडी समाजात असलेली रूढी परंपरा या सर्व बाबींना फाटा देत साध्या पद्धतीने आदर्श विवाह पार पडला असून हा प्रयत्न इतरांसाठी एक आदर्श निर्माण करत आहे.

श्रीमती स्वाति – स्व. मनोहर काकाणी, भिवंडी निवासी यांची कन्या व अकोला येथील शंकरलालजी बियाणी यांची नात जुही आणि चिखली निवासी सौ. सरोज-डॉ अशोक जी मोदाणी यांचे सुपुत्र व मुर्तिजापुर निवासी जयकिसनजी डागा यांचे नातू चि.सौरभ यांचा विवाह माहेश्वरी भवन मध्ये

राजस्थानी नियमानुसार अकोला येथे पार पडला. लॉकडॉन मध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा विवाह अत्यंत साध्या पध्दतीने पार पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here