प्रशासनाच्या पत्रामुळे “भूमी मुक्ती मोर्चाचे” उपोषण आंदोलन तूर्तास स्थगित…

बुलढाणा – अभिमान शिरसाट

दिनांक 26 एप्रिल रोजी सोमवारी फत्तेपूर तालुका खामगाव येथील घाटात असलेल्या हनुमानजीच्या मूर्तीजवळ उपोषण आंदोलन करण्यासाठी भूमी मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली होती. फत्तेपूर, दधम, लाखनवाडा खुर्द, लाखनवाडा बु., जयरामगड, शिरला नेमाने, तसेच परिसरातील शेकडो आदिवासी, पारधी व मागासवर्गीयांनी सन 1999 पासून ते 2011 पर्यंत वन जमिनीवर अतिक्रमण करून जमिनी वहीती केलेल्या आहेत.

व त्यावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालू आहे. संबंधित अतिक्रमण धारकांवर वन विभागामार्फत यापूर्वीच गुन्हे दाखल केलेले असताना, आता नव्याने गुन्हे दाखल केल्यामुळे व संबंधितांची अतिक्रमण हटविण्याचे प्रयत्न चालू झाल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले.

मात्र आंदोलन चालू असतानाच हिवरखेड पोलीस स्टेशन मार्फत वन विभागाने सध्या कोवीड19( कोरोना) चा प्रादुर्भाव असल्याने वनक्षेत्रातील अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले.त्यामुळे संबंधित अतिक्रमण धारकावरील कारवाई तूर्तास टाळल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

परंतु प्रशासनाने जर भूमीहीनांची दखल घेतली नाही तर भूमी मुक्ती मोर्चा कडून 5 मे रोजी उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भूमी मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांनी दिला.

यावेळी प्रामुख्याने भाई रमेश गाडेकर (जिल्हा अध्यक्ष भुमी मुक्ती मोर्चा), अशोक इंगळे (तालुका अध्यक्ष भुमी मुक्ती मोर्चा), महेंद्र खंडारे (बहुजन मुक्ती मोर्चा), सुभाष धुरंधर, दीपा पवार, शेषराव चव्हाण, जहीर खान, हमीद खान, शिवदासजी तायडे व आंदोलक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here