पातुर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना मिळाले धनादेश…

पातूर तालुका प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आत्महत्याग्रसत्याचा परिवारांना धनादेश मिळण्यासाठी बाळापुर मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन बापू देशमुख यांनी महाराष्ट्र शासन कडे पाठपुरवठा केला पातूर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार दीपक बाजड यांच्या उपस्थितीमध्ये व पंचायत समिती सभापती लक्ष्मीबाई डाखोरे यांच्याहस्ते कुटुंबातील वारसदारांना प्रत्येकी एक लाख रुपये धनादेश देण्यात आला

यावेळी आत्महत्याग्रस्त (रामराव वासुदेव ढोकणे) यांच्या वारस रुक्‍मीनी वासुदेव ढोकणे गाव विवरा येथील असून यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला व आत्महत्याग्रस्त( रामा मधुकर लाहोळे )यांचे वारस अलका रामा लाहोळे राहणार अंबाशी यांनासुद्धा प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला

व त्यानंतर आत्महत्याग्रस्त( शेख सुलेमान शेख )यांचे वारस जमिला बी शेख सुलेमान राहणार पिंपळखुटा यांनासुद्धा प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला यावेळी उपसभापती नजमुन्नीसिया मॅडम व पंचायत समिती सदस्य झडपे पंचायत समिती सदस्य गोपाल ढोरे पंचायत समिती सदस्य अनिल इंगळे पंचायत समिती सदस्य नंदू डाखोरे तालुकाप्रमुख रवी मुर्तडकर शिवसेना उपशहरप्रमुख राहुल शेगोकार जनार्दन डाखोरे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here