संस्थाध्यक्षाने केला प्राध्यापिकेचा विनयभंग…पातूर पोलिसांत गुन्हा दाखल…

पातूर : शहरातील असलेल्या महात्मा फुले आर्टस अँड सायन्स कॉलेज चे संस्थाध्यक्ष व सचिव ने प्राध्यापकिचा विनयभंग केल्याचि घटना दिनांक 22सप्टेंबर ला दुपारी 11 वाजता चे दरम्यान घडली .याबाबत सविस्तर वृत्त असे कि महात्मा फुले आर्टस अँड कॉलेज चे संस्थाध्यक्ष व सचिव व कर्मचारी यांच्यात अनेक दिवसा पासून काही कारण वरून वादविवाद सुरु होते.

यापूर्वी सुद्धा कॉलेज च्या कर्मचाऱ्यांनि मागील महिन्यात संस्थाध्यक्ष व सचिव यांच्या विरुद्ध एक दिवसीय आंदोलन छेडण्यात आले होते या घटनेचा राग मनात असलेल्या संस्थाध्यक्ष व सचिव असलेल्या बापबेट्यानि कर्मचारी वर्गासोबत अपमानजनक व्यवहार करण्यास सुरुवात केली असता आज दिनांक 22सप्टेंबर रोजी कॉलेज च्या प्राध्यापक महिलाव कर्मचारी स्टॉप हे कॉलेज मध्ये जाऊन आमचे पगार केव्हा देता व एक दिवसीय संप पुकारला होता त्याचा पगार कपात का केला

असे विचारले असता संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे व सचिव हरीश सुभाष बोचरे या बाप बेट्यानि महिला प्राध्यापक हिस शिवीगाळ करून लोटलाट करून महिला प्राध्यापकेचा विनयभंग केला महिला प्राध्यापक ने तडक पोलीस स्टेशनं गाठून संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे व सचिव हरीश बोचरे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असून बाप बेट्या विरुद्ध पातूर पोलिसांनी अप नंबर 518/20 कलम 354, 504, 506 भादंवि गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here