गावातील पथदिव्याचा निधी भरणार शासन…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पथदिवे बाबद प्रश्न काही महिन्यांपासून सुरू होता.अनेक गावात पथदिवे बंद होते.महावितरण थकबाकी असल्याने बत्ती गुल केली होती. यावर पुढे येऊन सरपंच संघटनेने आंदोलन छेडले होते. अखेर आंदोलन दखल घेत राज्य शासन राज्यातील ग्राम पंचायतीचे पथदिव्यांचे बिल शासन भरणार असल्याचे निर्णय घेण्यात आला आहे.

ग्राम संवाद सरपंच अशोसिएशन ने महावितरण विरोधात आंदोलन केले होते.त्याला आता कुठे तरी यश प्राप्त झाले.राज्यातील ग्राम पंचायतीच्या पथदिव्यांची थकबाकी भरण्याचा निर्णय शासनाने घेतला असून मागील व येथून पुढे राज्यातील पथदिव्यांची थकबाकी व चालू बिल राज्य शासना मार्फत जिल्हा परिषदेला पाठविण्यात येणार व जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडे अनुदान पाठवून प्रति महिना मागील व चालू वीज देयके पथदिव्यांची शासन भरणार असल्याने ग्राम पंचायत मोठा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मागील काही महिन्यांपासून गावातील पथदिव्यांची बत्ती गुल असल्याने गाव अंधारमय झाले होते.अशातच सरपंच संघटनेने आंदोलन केले होते.त्यांचा आंदोलन मात्र यश आले.आता राज्यातील ग्राम पंचायतीचे पथदिवे सुरू राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here