अकोट – कुशल भगत
चोहोट्टा बाजार जवळच्या व्यक्तीचेनिधन झाल्यावर रुढी, परंपरेनुसार मुलांनी अग्निसंस्कार करावेत. महिला, मुलींना स्मशानात जाणे, अंत्यसंस्कार करणे वर्ण्य मानले जाते; परंतु अलीकडच्या काळात रुढी, परंपरांना बाजूला सारून वैज्ञानिक विचार रुजत आहेत. चोहोट्टा बाजार येथे वडिलाच्या निधनानंतर दोधी बहिणींनी पार्थिवाला खांदा देत,
अग्निसंस्कारसुद्धा केले.
इतिहासाचे अभ्यासक व सेवानिवृत्त शिक्षक अशोक इंजनकार यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या अंत्यविधीची पूर्ण जबाबदारी त्यांच्या दोन मुली अर्चना व अस्मिता यांनी पार पाडली. दोघींनी वडिलांना खांदा देऊन अग्निसंस्कारही केले.
रविवारी कन्या दिनी वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच, दोघीही रुग्णालयात दाखल झाल्या. अशोकराव इंजनकर यांनी येथीलच सार्वजनिक महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. इतिहास विषयाची त्यांना आवड होती. त्यांच्या निधनाबद्दल जैन संगटना, शिक्षक संघटना व माजी विद्यार्थ्यांनी दुःख व्यक्त केले.