२८ वर्षापूर्वी केला होता मुलीचा विनयभंग…आता नातवंड खेळवण्याच्या वयात झाली अटक…जाणून घ्या प्रकरण

प्रकरण आहे छत्तीसगड राज्यातील – दुर्ग पोलिसांनी तब्बल 28 वर्षानंतर विनयभंग प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे. घटनेच्या 3 वर्षानंतर फरार असलेला आरोपी आपले नाव बदलून पाटण परिसरात राहात होता. दरम्यान, ज्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला, त्या स्टेशनचे 20 ठाणेदार बदलून गेले. आता आरोपीचे वय 58 वर्षे झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तक्रारदार मुलीबद्दल पोलिसांना अद्याप काहीही माहिती नाही. पोलिस आता त्याचा शोध घेणार.

खरं तर पूर्वी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस जुन्या गुन्ह्यांच्या नोंदी शोधत होते. या दरम्यान शिक्षण नगर येथे राहणारा दुर्गा प्रसाद उर्फ ​​जुगरू देवांगन हा आरोपी बराच काळ फरार असल्याची माहिती मिळाली. 28 वर्षांपूर्वी 1993 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी एका युवतीच्या घरात प्रवेश करून विनयभंग केला. तेव्हापासून तो गायब झाला आणि आता त्याच्या विरुध्द पुन्हा वारंट निघाला. त्याच्याविरूद्ध अनेकवेळा कोर्टाकडून अटक वॉरंटही देण्यात आले होते, परंतु तो पोलिसांना सापडला नाही.

पोलिसांना माहिती मिळाली की आरोपीच्या ओळखीचा एक माणूस पाटणमध्ये चपला दुकान चालवतो. यावर साध्या कपड्यांसह पोलिसांची टीम त्याच्या दुकानात पोहोचली. तेथून एक जोडी शूज देखील विकत घेतली. शिक्षक नगरात एका परीचीताचा शोध घेत आहोत पोलिस कर्मचारींनी सांगितले. चर्चा सुरु असताना दुर्गा प्रसाद यांनी सांगितले की तो सुमारे 25 वर्षांपूर्वी तेथून पाटण येथे आला आणि त्याने दुकान उघडले. शहर कोतवाली प्रभारी राजेश वागडे यांनी सांगितले की, पुष्टी दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. एएसपी संजय ध्रुव यांनी सांगितले की आम्हाला संबंधित महिलेबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही, तिची माहिती गोळा केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here