३६ तास चालला मृतांना जिवंत करण्यासाठी अंधश्रद्धेचा खेळ…

न्यूज डेस्क – देशात मोबाईल आल्यानंतर आता शहरीच नाहीतर ग्रामीण भाग हि आता सजग होत आहे,मात्र शतकानुशतके सुरु असलेला अंधश्रद्धेचा खेळ मात्र अद्याप हि सुरूच आहे. राजस्थानच्या ढोलपूर जिल्ह्यातील सदर पोलिस स्टेशन परिसरातील दरियापुर गावात रविवारी विषारी सापाच्या चावल्यामुळे बाप-लेकाचा मृत्यू झाला. परंतु कुटुंब या दोघांनाही मृत समजत नव्हते. त्यांनी झाडफुक करणाऱ्या तांत्रिकाच्या मदतीने त्यांना जिवंत ठेवण्यासाठी उठाठेव केली.

मृतकांच्या नातेवाईकांनी सदर मृतदेह तांत्रिकाच्या ताब्यात देवून त्यावर तांत्रिक अंधश्रद्धेची विविध विधी करीत होता तर गावकरी मंडळी त्याचा तमाशा बघत होती. वेळ निघत जात होती मात्र तांत्रिकाच्या विधी सुरूच होती, दोघांच्या मृत्यूच्या ३६ तासांपर्यंत अंधश्रद्धेचे प्रयोग सुरूच होते.

एवढ्या विधी करूनही मृतक जिवंत झाले नाहीत नंतर शेवटच्या अंतसंस्कारांसाठी वडील व मुलाचे मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आले. गावकर्यांनी साप पकडला आणि बाटलीत बंद करून आणला यावेळी तांत्रिकही स्मशानात पोहोचले आणि आणि शेवटची विधी होण्याआधी पुन्हा तंत्रमंत्रविधी सुरु केला मात्र त्याचा खोटा विधी पाहून कुटुंबानेही आता आशा सोडली होती.

दरम्यान, साप पकडण्यासाठी वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. पण गावकर्यांनी त्या सापाला ठार मारुन टाकले होते दुसरीकडे, या प्रकरणानंतर लवकरच सदर पोलिस स्मशानभूमीत पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतांच्या नातेवाईकांना समजावून सांगितले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.

याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी सुमारे अर्धा डझन तांत्रिक आणि त्यांचे सहकारी यांना ताब्यात घेतले. आता त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here