फुलारी परिवाराचा असाही आदर्श अभ्युदय फाउंडेशन च्या आवाहनाला प्रतिसाद…

पातूर : पातुरच्या स्मशानभूमी मध्ये विविध सेवा देणाऱ्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने केलेल्या संकल्प यज्ञाला फुलारी परिवाराने प्रतिसाद देत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून आदर्श प्रस्थापित केला.

अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना सेवा देण्यासाठी पातुरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने व्रत हाती घेतले आहे. त्यानुसार ही संस्था पातुरच्या समशानभूमीत सेवा देत आहे. या ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून दवण्यासाठी मदतीचे आवाहन अभ्युदय फाउंडेशनने केले होते.

या आवाहनाला सर्वप्रथम पातूर येथील सर्व फुलारी परिवाराने सकारात्मक प्रतिसाद देत थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. यावेळी फुलारी परिवाराने वॉटर कुलर अभ्युदय फाउंडेशन ला समर्पित केला. यावेळी फुलारी परिवाराचे वतीने या वाटर कुलर चे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन, प्रशांत बंड, दिलीप निमकंडे आदी सभासदांना फुलारी परिवाराने समर्पित केला. यावेळी पातूर येथील परिवारातील सदस्य उपस्थित होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here