पणज येथे दोन दिवसांपासुन झाडावर अडकुन असलेल्या माकडांना वाचवण्यासाठी वन विभाग करत आहे तारेवरची कसरत…

आता पर्यंत दोन माकडांना वाचवण्यात वन विभागाला यश.

अकोट – कुशल भगत

अकोट तालुक्यातील येणाऱ्या ग्राम पणज येथे दोन दिवसांपासुन एका झाडावर काही माकडे बसलेली होती व त्या झाडाच्या आजुबाजुला सर्व पाणी साचल्या मुळे ही माकडे त्या झाडावर अडकुन पडली होती पणज येथील काही गावकऱ्यांना यांची माहिती मिळताच त्यांनी वन विभागाशी संपर्क साधुन सर्व माहिती दिली.

त्याच माहीतीच्या आधारे या ठिकाणी वन विभागाची टीम दाखल होऊन त्या झाडावर अडकुन बसलेल्या माकडांना वन विभागाकडुन बचाव कार्य सुरु करुन त्यातील दोन माकडांना वाचवण्यात वन विभागाला यश आले आहे.

जवळच असलेल्या वाघोडा परीसरात झाडावर अडकुन असलेल्या माकडांना वाचवण्यासाठी वन विभागाचे अधीकारी व पथक येथे उपस्थित झाले होते अडकून पडलेल्या माकडांना पाण्या बाहेर सुरक्षित ठिकाणी काढण्याचे प्रयत्न वन विभाग व पणज येथील गावकरी यांच्या कडून सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here