बिलोली शहरातील कोरोनाचा पहिला बळी…

रत्नाकर जाधव

■तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असून या संसर्गचा पहिला बळी शहरातील ईदगाह गल्लीत गेला आहे.येथील एका ६५ वर्षीय महिला कोरोनाच्या संसर्गामुळे दगावली आहे.महिलेच्या मृत्यूनंतर तिचा कोरोनाचा रेपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

■बिलोली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आत्ता प्रयन्त चार जनांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या त्यांच्या संपर्कातील सर्वच जनांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.त्यानंतर चार पैकी दोघा बाधितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून दोघे कोविड सेंटर मध्ये क्वांरटाईल काल दि.४ जुलै रोजी शहरातील एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला उपचारासाठी नांदेडला नेले असता तिचा मृत्यू झाला.

दरम्यान त्या महिलेच्या लाळेचे नमुने तपासले असता तिचा कोरोनाचा रेपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वाडेकर यांनी सांगितले.सदरील महिलाचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर ती रहात असलेला भाग कंटेन्मेंट एरिया म्हणून नगरपरिषदेच्या वतीने सिल केला असल्याची माहिती मुख्याधिकरी प्रशांत व्हटकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here