१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधीचा पहिला टप्पा स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार…

रत्नाकर जाधव – बिलोली

◆पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी सण २०२०-२१ चा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे १०:१०:८० या प्रमाणात वितरित करण्यासाठी १४५६.७५ कोटी रुपये केंद्राकडून देण्यात आला आहे.याचा पहिला टप्पा जिल्हा परिषद, पंचायत समिती,ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

◆पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सण २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा बेसिक ग्रँटच्या पहिला हप्त्याचा केंद्रशासनाकडून देण्यात आलेला १४५६.७५ कोटी रुपये एवढा निधी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे.सदर निधी सर्व पंचायत राज संस्थांना जिल्हा परिषद,ओणचायत समिती व ग्रामपंचायत मध्ये अनुक्रमे १०:१०:८० या प्रमानात वितरित करण्यात येणार आहे.

◆पंधराव्या वित्त आयोगातून अलेला निधी ही १४ व्या वित्त आयोगा सारखाच गावांची गरजांची निश्चिती करून कामे ठरवण्याचा अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहेत. विशेषतः पाणीपुरवठा,स्वछता, पावसाच्या पाण्याच्या सिंचनाचा संबधित योजना यांचा समावेश आहे.

परंतु पंधराव्या वित आयोगाच्या निधीतून ग्रामीण स्थानिक संस्थांना कर्मचारी पगार तथा आस्थापना बाबी या साठी हा निधी वरण्यास मनाई केली आहे.१५ व्या वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकारने राज्यसरकार कडे पाठवून हा निधी तात्काळ जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतींना वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात विकास कामे लवकर सुरू होणार आहेत.

◆केंद्रशासनाने पाठवलेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधी मध्ये मराठवाड्यातील आठ ही जिल्ह्याला वितरित केलेला निधी अनुक्रमे औरंगाबाद-४९ कोटी ११ लाख ४६ हजार, नांदेड-५७ कोटी १३ लाख ६३ हजार, जालना-३७ कोटी ३७ लाख ८४ हजार, परभणी- २ कोटी ९९ लाख २९ हजार, हिंगोली-२३ कोटी ५८ लाख ७३ हजार, बीड-४९ कोटी २७ लाख १२ हजार, लातूर-४२ कोटी ३९ लाख ८८ हजार, उस्मानाबाद-३२ कोटी ९६ लाख ६६ हजार. एवढा निधी प्राप्त झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here