चिंचणी येथिल शेतकरी कुटुंबिया कडून पयाॆवरण पुवॆक ट्रि गणपती नाविन्य गणेशोत्सवा व्दारे सवॆ गणेश भक्तांना आगळा वेगळा संदेश दिला…

पालघर – भरत जगताप.

पालघर : सुहास राऊत कुटुंबियाकडील हा आहे पर्यावरण स्नेही गणपती. आपल्या शेतातील माती वापरून अतिशय सुबक पणे केलेला हा गणपती शेतकऱ्यांसाठी व आपल्या परिसरासाठी विशेष दखल घेण्याजोगा आहे.

आपल्या घरात जवळील शेतातली माती म्हणजे नवनिर्मितीचे प्रतीक. ही माती वापरून कलात्मक पद्धतीने हा गणपती साकारला आहे. याचे विसर्जन सुद्धा मातीच्या कुंडीत करून कुंडीतल्या मातीत तुळशीचे बीज रोवले आहे.

या कुंडीत आपण कोणतेही बीज टाकू शकता. मातीच्या गणपतीचे विसर्जन कुंडीत केल्यावर या कुंडीतून नवीन झाडांची निर्मिती होईल . पर्यावरण पूरक असा हा गणपतीचा ‘ ट्री गणपती’ म्हणून सुद्धा ओळखला जातो. मूळच्या मातीच्याच रंगाचा असल्यामुळे त्याचे देखणेपण मनाला भावते.

चिंचणी राऊत पाडा येथील त्रिवेणी व पर्णिका या राऊत भगिनींनी ह्या गणपतीची निर्मिती केली आहे. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी झाडे जगवावीत आणि गणपती आपल्या आवाक्या प्रमाणे सुखद आनंद देणारा असावा तसेच गणपतीचे अनाठायी प्रस्थ करु नये हा विचार सर्व तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

|| गणपती बाप्पा मोरया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here