मनोर – मुंबई अहमदाबाद महामार्गावर सातीवली गावच्या हद्दीत शुक्रवारी (ता.18)दुपारी कापडाच्या चिंध्या वाहतूक करणाऱ्या टेम्पोला समांतर चालणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला.

यात टेम्पोच्या डाव्या भागाचा चक्काचूर झाला असून टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला आहे.अपघातामुळे टेम्पो मधील कापडाच्या चिंध्याचे गठडे महामार्गावर विखुरले होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती.अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला होता.